स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये पावसाळी कामांबाबत अभियान राबविण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून नवी मुंबईत वरूण राजाने हजेरी लावली असून संततधार स्वरूपात पाऊस पडत आहे. प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. हा अधिकांश सिडको वसाहतीचा परिसर असून अल्प, अत्यल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे वास्तव्य आहे. प्रभाग ९६ मध्ये पाऊसाने गती पकडण्यापूर्वी आणि पाणी तुंबणे, झाडाच्या फांद्या पडणे, मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होणे, दूषित पाणी येणे, रस्त्यात खड्डे निर्माण होणे, पाणी साचणे, साथीचे आजार पसरणे यासह अन्य समस्यांचा उद्रेक होण्यापूर्वी नेरूळ आणि जुईनगरमध्ये पावसाळीपूर्व कामे कशी झाली आहेत, याबाबत आपण स्वत: अथवा अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने पाहणी अभियान राबवावे. त्यामुळे पाऊस गती पकडण्यापूर्वी नेरूळ प्रभाग ९६ मधील परिसरात पावसाळा कालावधीत कोणतीही जिवित व वित्त हानीची कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी तातडीने उपाययोजना करावी. पावसाळीपूर्व कामांमध्ये काही निष्काळजीपणा दाखवून काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून दिला आहे.