Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : पाऊसामुळे पामबीच मार्गावर खड्डेच खड्डे पडले असतानाही ते खड्डे बुजविण्यास पालिका प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवित वाहने न्यावी लागत असल्याने पालिकेच्या अकार्यक्षमतेबाबत वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पामबीच मार्गावर वाशीहून बेलापूरकडे जाताना मोराजचा सिग्नल सोडल्यावर काही अंतरावरच मधल्या मार्गिकेवर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तेथून पुढे आल्यावर त्याच मार्गावर नेरूळ चौकाच्या अलिकडे रस्त्यावेर जलवाहिन्या असलेल्या ठिकाणीही मधल्याच मार्गिकेवर खड्डे पडलेले आहेत. पामबीच मार्गावर दोन्ही बाजूला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूला वाहने जात असल्याने मधल्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहनांना खड्यातूनच वाहने पुढे न्यावी लागत आहे. पालिका प्रशासन या खड्यामुळे अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून विचारला जात आहे.