गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा, सणांचा पवित्र महिना समजला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्व आहे. तसे श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहे. कारण शिवपूजनाला महत्व असणाऱ्या या पवित्र महिन्याची वाट महिला वर्ग वर्षभर वाट पाहतात. याच महिन्यात येणारे मंगळागौरीचं व्रत हे मुख्यत्वे नवविवाहित महिलांकडून तसेच सुहासिनी स्त्रियांकडून पाळले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत मानले जाते. याच अनुषंगाने आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेमार्फत “खेळ खेळूया मंगळागौरीचा” कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेच्या सर्व सदस्यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राची उद्योगिनी ग्लोबल वेलनेसच्या अम्बेसेडर रेखा चौधरी, सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे व समाजसेविका उषा दत्ता यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा व बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था ही गेली २८ वर्षे खास महिलांसाठी सांस्कृतिक महोत्सव व विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. तसेच श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांचा अतिशय उत्स्पुर्द प्रतिसाद, उत्साह त्यांचा आत्मविश्वास हा जागृत होण्यास आज रंग मंचावर पहावयास मिळाला. आज या कार्यक्रमास घरात असणारी महिला ही गृहिणी होती की डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षिका की नर्स होती व वयाचे बंधन न पाहता हे सर्व विसरून महिलांनी एकदम मस्त व अतिसुंदर मनमुराद आनंद लुटलेला आहे. तसेच जणू काय मंगळागौरीचेच दर्शन झाले की काय असे महिला नटून थटून आल्या होत्या. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेमार्फत कार्यक्रम घेते त्या त्या वेळी महिलांचा उत्स्पुर्द प्रतिसाद मिळत असतो आपली संस्कृती, आपली परंपरा येणाऱ्या पिढीला माहिती असली पाहिजे तिचे जतन केले पाहिजे यासाठी सर्व महिलांनी पारंपारिक वेशभूषेत नटून थटून आल्या होत्या.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, आपल्याला भावी जीवनामध्ये कधीच प्रेम मिळत नसतो तो वेळ काढावा लागतो आणि मी खास महिलांसाठी नेहमीच कार्यक्रम करीत आलेली आहे. जवळजवळ गेली २८ वर्षे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत आली आहे त्यात उद्योजिका शिबीर, बचत गटांकरिता फ्री स्टॉल असतील असे वेगवेगळे उपक्रम या संस्थेमार्फत नेहमीच होत असतात. काहीतरी महिलांनी करावं पुढे याव स्वत:च्या पायावर उभे राहावे. कुबड्या करून कुठल्याही महिलेने जीवन जगू नये आपण जीवनामध्ये काहीतरी थोड काम केल पाहिजे आणि समाजाचे आपण काही तरी बांधिलकी आहोत ते जपण्यासाठी काही तरी केल पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचे काम या संस्थेने फक्त 3 तासामध्ये केले आहे. तसेच सर्व महिला या किती उत्साहात नृत्य करीत होत्या जणू काय त्या अजून लहानच आहेत की काय असे वाटत होत्या. बऱ्याच कलाकारांनी सांगितले की, ताई तुम्ही आजपर्यंत संस्थेमार्फत जो आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्यामुळे आज आशीमित कामठे व सायली राऊल सारखी कलाकार निर्माण झाली आहे.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, बेलापूर विधानसभा क्षेत्रातील महिलांनी विविध प्रकारचे खेळ खेळून पूर्वज काळापासून चालत आलेली परंपरा दिसून आली आहे. यामध्ये मंगळागौरीची पारंपारिक नृत्य, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद महिलांनी आनंद लुटला. तसेच यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी बोलून आणि खेळ खेळण्याची संधी महिलांना मिळाली. तसेच मंगळागौरीच्या कार्यक्रमात एकूण १५ महिला मंगळागौरी ग्रुपने सहभाग घेतला होता. तसेच या मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य म्हणून माऊली ग्रुप (नेरूळ), स्वरांजली कल्पतरू ग्रुप (सीबीडी), साईभक्त महिला मंडळ (सानपाडा) या सर्वांना एकत्रित रोख रक्कम आणि पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट मराठमोळ्या वेशभूषा म्हणून लता पवार यांना सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले व उत्तेजनार्थ म्हणून गुड शेफर्ड स्कूल (बेलापूर), जयश्री लोंडे ग्रुप (सीबीडी), रिदम डान्स ग्रुप (नेरूळ) प्रगती ग्रुप (सीबीडी), शीतल फिटनेस ग्रुप (नेरूळ), सायली आर्ट्स ग्रुप (सीबीडी) यांनाही रोख रक्कम आणि पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले व नशीबवान महिला म्हणून लकी ड्रॉद्वारे इंदुमती पाटील, हेमलता आसोले (सानपाडा), सविता पांचाल (वाशी), योगिता म्हात्रे, कुसुम म्हात्रे (बेलापूर), मनीषा मोरे, स्मिता जोवेल (नेरूळ पूर्व), उषा सिंह, पूर्व सूर्यवंशी (नेरूळ पश्चिम), रंजना ठाणगे, वैशाली जगदाळे (सीवूडस) यांना प्रत्येकी पैठणी व नाकातील मौल्यवान सोन्याची नथ तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका संगीता सुतार, माजी नगरसेविका कविता जाधव, माजी नगरसेविका रत्नाताई विश्वासराव, नमिता म्हात्रे, शारदा आमले, उल्का तिकोने, स्वाती म्हात्रे, वंदना चौधरी, उर्मिला भाटीया, आरती राऊल, देवयानी मुकादम, शीतल जगदाळे, अलका कामत, चैताली ठाकूर, मनीषा मनोरे, सुरेखा बामनकर, ममता सिंग, लाजवंती भोसले, सुमन डोहळे, ज्योती पाटील व असंख्य महिला बचत गट, महिला शिक्षिका वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.