संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – नवी मुंबईतील सुमारे ३०० वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. तसेच नवी मुंबईच्या नावलौकीकाला साजेशा व चिमाजी अप्पांपासून ३०० हून अधिक वर्षाच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या आई गोवर्धनी माता मंदिर आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी आई गोवर्धनी मातेची जनमाणसात ख्याती आहे. आई गोवर्धनी माता मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून तसेच या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धार १५ वर्षापूर्वी उद्योजक विजय नारायण म्हात्रे व आमदार मंदाताई म्हात्रे हस्ते करण्यात आला होता.
आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सांयकाळी ४ वाजता संकल्प महिला मंडळ नवी मुंबई यांच्या वतीने “भोंडला व पारंपारिक देवीची गाणी ” तसेच सांयकाळी ५ वाजता “हळदी कुंकू” चा कार्यक्रम होणार आहे व सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजता आईचा ‘नवचंडी होम व दुपारी १ नंतर ‘महाप्रसादाचा’ कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच या “नवरात्रोत्सवा” शुभदिनी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून “महाप्रसादाचा” लाभ घ्यावा असे आग्रहाचे आमंत्रण बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.