संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
सारसोळे मच्छीमार्केट कात टाकणार – मार्केटचे भूमिपूजन पडले पार – ७७ लाख निधी मंजूर
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे सर्व सुविधायुक्त म्हणून नावारूपास आहे. परंतु नवी मुंबईतील गावठाणांचा विकास व्हावा या करिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे या नेहमी कार्यतत्पर आहेत.दिवाळे गावाचा कायापालट करून स्मार्ट व्हीलजेच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच, इतर गावांमध्ये देखील विकासकामांना आ. मंदाताई म्हात्रे यांनी सुरुवात केली आहे. शहरी व गावांच्या विकासाचा समसमान पातळीवर विकास करत आ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्वांना समान न्यायचे सूत्र हाती घेतले आहे. शनिवारी सांयकाळी सारसोळे गावातील जीर्ण झालेल्या मच्छी मार्केटचे भूमिपूजन संपन्न झाले. यासाठी ७७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सुसज्ज मच्छीमार्केट उदयास येणार आहे.
सारसोळे गावातील मच्छीमार्केट हे पूर्ण मोडकळीस आले आहे. त्याच अवस्थेत मच्छीमार तिथे व्यवसाय करत आहेत. अशा जीर्ण अवस्थेत असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सारसोळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या कार्यालयात येऊन दिवाळे गावासारखे सुसज्ज मच्छिमार्केट साररसोळे गावात आपल्या आमदार निधीमधून बांधून देण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यानुसार आ. मंदाताई म्हात्रे यांनी स्थानिक विकास निधीमधून रक्कम ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यातून सर्व सुविधायुक्त अशी मच्छीमार्केटची वास्तू उभारण्यात येणार आहे. तसेच अपुऱ्या जागेत अभावी सुसज्ज सर्व सुविधायुक्त असे मच्छिमार्केट उभारणे हे शक्य नव्हते परंतु मार्केटचे नियोजन व लागणारा खर्च तसेच इत्यादी बाबींचा अभ्यास करून G+1 असे मच्छिमार्केट बनवणार आहे. सदर मार्केटमध्ये जास्तीत जास्त गाळे कसे बनतील यावर जास्त भर देऊन ७७ लाख रुपयापेक्षा जास्तीचा निधी वापरून मार्केटची उभारणी करण्यात येणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नवी मुंबई माजी महापौर जयवंत सुतार, रामचंद्र घरत, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका शशिकला पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, माजी परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, राजेश राय, जयश्री चित्रे, सुहासिनी नायडू, जयेश थोरवे, संदीप मेहेर, जयेश मेहेर, परशुराम मेहेर, सुर्यकांत तांडेल उपस्थित होते.
सार सोळे गाव देखील होणार ” स्मार्ट ‘
आ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे स्मार्ट व्हिलेज करण्यास सुरुवात केली आहे. गावाचे पालटलेले रुपडे पाहून इतर गावांमधून देखील आ. म्हात्रे यांच्याकडे स्मार्ट व्हीलेजची मागणी वाढू लागली आहे. अशात आता आ. म्हात्रे यांनी सारसोळे गावाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात पाण्याचे जलकुंभ, बहुद्देशीय इमारत, तरुणांकरिता व्यायाम शाळा, सोलर हायमास्ट व इतर स्थापत्य कामाकरिता स्थानिक आमदार निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच गावालागत एखादी मोठी जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी मच्छिमार बांधवांकरिता मासली ठेवण्याकरिता कोल्डस्टोरेज उपलब्ध करून त्यांना दिलासा दिला जाईल. असे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल नागरी सत्कार
एमएमआरडीए” तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील सारसोळे गाव येथील १५० मच्छीमारांना आ. मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एक रकमी नुकसान भरपाई ३ लाख ३७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी सदरची प्रक्रिया अपूर्ण आहे ती लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून उर्वरित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी आ. मंदाताई म्हात्रेंचा नागरी सत्कार करण्यात आला. माझा कोणताही कोळी बांधव हा या नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन आ. म्हात्रे यांनी दिले. तसेच सारसोळे मच्छिमार्केटच्या भूमिपूजनाचे आभार मानत प्रभागामधील शिवसैनिकांनी विशेष सत्कार केला.