स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com- ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन मे महिन्यात मंदाताई म्हात्रे यांनी सतत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन व्हावे यासाठी सातत्याने बेलापूर येथील आमदार मंदाताई मात्रे यांनी पाठपुरावा केलेला असल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेतील कामकाजादरम्यान दिली.
नवी मुंबईमध्ये बऱ्याच राज्यांची भवन आहेत. महाराष्ट्र भवनासाठी आमदार मंदाताई म्हात्रे या सातत्याने सरकारकडे विचारणा करत होत्या. आज मी इथे सांगतो की, सिडकोतर्फे या संदर्भातला जो काय आराखडा आहे, तो पूर्ण करण्यात येईल. आणि एकदा मे महिन्यात कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करण्यात येईल, अशी मी इथे घोषणा करतो आणि मी इथे परत सांगतो की, महाराष्ट्र भवन व्हावे यासाठी मंदाताई म्हात्रे यांनी पाठपुरावा केलेला आहे. मे महिन्यात महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतिम अर्थसंकल्पावरील चर्चेत उत्तरात विधानसभेमध्ये केली.