अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
कलश या गोष्टीला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. कलश गृहप्रवेशापासून ते सत्यनारायणाच्या पूजेतही आवर्जुन वापरला जातो. तांब्याचा हा कलश हिंदू धर्मात शुभ प्रतीक मानला गेला आहे. त्यानुसार नेरूळ नोडमधील स्थानिक माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत, भाजपा नवी मुंबई चिटणीस गणेशदादा भगत, समाजसेवक संजय पाथरे, भाजपा युवा मोर्चा चिटणीस सचिन लवटे यांच्या वतीने नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ मधील ४०० घरगुती गणपती चे दर्शन घेताना भक्तानां तांब्याचा कलश व श्री आरती संग्रह भेट देण्यात आला
या वेळी समाजसेवक भरत सकपाळ, भाजपा सदस्य रमेश नरवडे, देवप्पा लवटे, दिपक जाधव, ओमकार कासुरडे, प्रमोद प्रभू, विकास तिकोणे, अशोक गांडाळ, अक्षय विनेरकर, नितिन मराठे, वैभव जाधव, विशाल लवटे, अश्विन ढमाल, मयुर पवार, सावंता गडदे, पार्थ शाह, अजित पालसिंग जोसेन, अक्षय कोकिटकर, सुशील लवटे, यश्वीत गडदे, फिरोज खान, रुणाल सुर्वे, रविंद्र भगत उपस्थित होते