Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून व आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये विकास कामांची गंगा वाहत आहे. दिवाळे गावातील कोळी बांधव हे गुण्या गोविंदाने राहत असून आपले पारंपारिक सण-उत्सव साजरे करीत असतात. त्याच अनुषंगाने जसे संपूर्ण महाराष्ट्र हा दिवाळी सणाची वाट पाहत असतात. त्याचबरोबर दिवाळे गावातील लहान मुले, तरुण, तरुणी, वयोवृद्ध मंडळीं हे श्री बहिरीनाथ वस्तादाच्या आगमनाची वाट आतुरतेने पाहत असतात. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून या श्री बहिरानाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनकरिता बसण्याची व्यवस्था व पाण्याची इतर अत्यावश्यक सुविधा व विविध विकास कामांकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून २३ सप्टेंबर रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, दिवाळे गावात दिवाळी सणानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त श्री बहिरीनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु सदर मंदिर गाभाऱ्यात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने भाविक भक्तांचे अतोनाथ हाल होत असतात. त्यामुळे भाविक भक्तांसाठी बसण्याची व्यवस्था व इतर सुख सुविधांसाठी सदर सभामंडप उभारण्यात येत असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच दिवाळे गावातील ग्रामस्थांची शाळा ही गेली ७० वर्षेहून अधिक जुनी पूर्वीची असून ती मोडकळीस अवस्थेत आहे. या शाळेचा पुनर्विकास करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून रक्कम १० कोटी रुपये निधीची निविदा जाहीर करण्यात आली असून ग्रामस्थांच्या शाळेचे लवकरात लवकर भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. त्याच बरोबर दिवाळे गावातील स्मशानभूमीकरिता ४ कोटी रुपये निधी मंजूर केला असून त्याचेही लवकरात लवकर भूमिपूजन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर शहराच्या विकासाबरोबर ही मूळ गावांचा विकास व्हावा व गावातील नागरिकांचा राहणीमान व दर्जा उंचावण्यासाठी स्मार्ट व्हिलेज अंतर्गत दिवाळे गावाचा संपूर्ण कायापालट झाला असून दिवाळे स्मार्ट व्हिलेज हे अंतिम टप्यात आले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये विविध प्रकारचे विकास कामे झाले असून काही कामांचे भूमिपूजनही सुरु आहेत. श्री बहिरीनाथ देवाचा सभामंडप भविष्यात दुमजली कसा होईल, त्याकरिता लागणाऱ्या परवानग्या व अजून काही अत्यावश्यक सेवा सुविधा देता येतील याकरिता महापालिका निधीही उपलब्ध केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी सभागृह नेता पंढरीनाथदादा पाटील, स्थानिक माजी नगरसेविका भारतीताई कोळी, श्री बहिरनाथ दीपोत्सव मंडळाच्या सदस्य चंद्राबाई तांडेल, लक्ष्मीबाई तांडेल, फगेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष अनंता बोस, डोलकर मच्छीमार संस्था अध्यक्ष तुकाराम कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष रमेश हिंडे, छाया कला सर्कल ब्रास बँडचे सदस्य श्याम कोळी, प्रेम सागर ब्रास बँडचे सदस्य अशोक कोळी, दिवाळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, एकविरा खोपट मच्छीमार संस्था अध्यक्ष सत्कार कोळी, एकविरा मच्छी महिला विक्रेता अध्यक्षा सुरेखा कोळी,राम मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, करणानी सर, कुमार कोळी, ज्योती पाटील, कल्पेश कुंभार तसेच शहर अभियंत शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता संजय दादा पाटील, उपअभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता स्थापत्य कांचन वानखडे, कनिष्ठ अभियंता विद्युत प्रज्ञा मोरे, बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, स्थानिक नागरिक व असंख्य महिला उपस्थित होत्या.