स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी बांधव असे सामान्यप्रमाणे म्हणता येईल. सर्वसाधारण जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात व संस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्टयपूर्ण चालीरीती किंवा संस्कृती आदिवासींत आढळतात. नेरूळ उरण फाटा येथील डोंगर दऱ्याखाली वसलेली आदिवासी पाडा असून मोजून १० ते १५ घरे ही आदिवासी बांधवांची आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत उरण फाटा येथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले आदिवासी बांधव हे गुण्यागोविंदाने राहत असून विविध प्रकारचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत असतात. परंतु आदिवासी बांधवांची पक्की घरे नसल्याने अति पावसाळ्यामुळे त्यांचे अतोनाथ हाल होत असतात. याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून CSR फंडातून रक्कम ५० लाखांचा निधी मंजूर करून आदिवासी बांधवांना नवी मुंबई महापालिकेमार्फत पक्की घरे उपलब्ध करून देणार आहेत. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसेच सह व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून लवकरात लवकर भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नेरूळ येथील उरण फाटा आदिवासी पाडा मधील आदिवासी बांधवाना लवकरच पक्की घरे मिळणार असून त्यांचे राहणीमान उंचावणार असून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडविण्याचे काम आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे होत असल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.