स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ’लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे मनसे हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या संदर्भात मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी परिवर्तन यात्रेदरम्यान सीवूडसमधील ग्रँड सेंट्रल मॉल येथील सिनेपोलिस सिनेमागृह प्रशासनाला निवेदन दिले व सिनेमा प्रदर्शित करू नका असा सज्जड दम दिला.
हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणे हा प्रकार मनसेला मान्य नाही. महाराष्ट्र सोडाच, पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते, तेव्हाही राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर मनसेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे हा सिनेमा सिनेपोलिस चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये ही अशी विनंती गजानन काळे यांनी सिनेमागृह प्रशासनास केली. हा सिनेमा प्रदर्शित करायच्या भानगडीत सिनेपोलिस पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळ्ळ खट्याक पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला. मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, महिला सेना शहर सचिव यशोदा खेडस्कर, मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवले, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, गणेश भवर, विभागसचिव आप्पासाहेब जाधव, उपविभागअध्यक्ष संतोष टेकवडे, सुनिल शिंदे, राजेंद्र खाडे, शाखा अध्यक्ष संदीप कांबळे, अतिश पाटील, अखिल खरात, भरत माने, प्रणित डोंगरे, महेश सावंत, रामचंद्र कोकरे, अंकुश सानप, मंगेश काळेबाग, प्रद्युम्न हेगडे, शंकर घोंगडे-पाटील, मयांक घोरपडे, अमित टोंपे, किशोर ढवळे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.