स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्या विशेष सहकार्याने बेलापूर विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना तसेच रिक्षा चालक यांना धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर २ हा सिनेमा थिएटरमध्ये मोफत दाखवण्यात आला सिनेमा पाहण्यासाठी वाशी रघुलीला सिनेमा थिएटरमध्ये बेलापुर विधानसभा क्षेत्रातील ७०० पेक्षा जास्त महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी शिव वाहतुक सेवा, नवी मुंबईचे अध्यक्ष दिलीप आमले, उपजिल्हाप्रमुख सौ. संगिता दिलीप आमले तसेच अनेक सहकारी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, धर्मवीर आनंद दिघे तसेच शिवसेना पक्ष यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या.