स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ शिंदे यांना अज्ञात व्यक्तीने निनावी पत्राद्वारे धमकी दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एमआयएम पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्त डॉ. शिंदेना भेटले. संपूर्ण प्रकरणाची चर्चा यावेळी झाली. जनहिताची कामे करताना आयुक्त डॉ. शिंदे यांच्यासोबत एमआयएम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल, अशी ग्वाही एमआयएमचे कोकण प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी दिली.
सामान्य जनतेच्या पाठीशी राहून आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या निस्पृह अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनतेच्या पाठिंब्याची खरी गरज आहे. मुंबईमधून अविनाश बर्वे, श्रीरंग बापू वरगुंडे , तुकाराम पाटील, एस.बी.शेख, सोपान दुबाडे आदींसह प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेतला.
स्वतः डॉ शिंदे यांनी घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडे आपले म्हणणे मांडले आहे. पण हाजी शाहनवाज शेख यांनी या शिष्टमंडळासह आपल्या पक्षाचा पालिका आयुक्त शिंदे यांना जाहीर देत आयुक्तांच्या पाठीशी एमआयएम उभे राहणार असल्याचे सांगत कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या आयुक्त डॉ. शिंदे या प्रामाणिक जनसेवकाच्या केसाला धक्का लागला तरी एआयएमआयएम रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा हाजी शाहनवाज खान यांनी दिला आहे.