सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ८ विकेट्सने पराभूत केले आहे. बुधवारी (२ एप्रिल) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. गुजरातचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे आता त्यांचे ४ पाँइंट्स झाले आहेत. बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता.
या सामन्यात बंगळुरूने घरच्या मैदानात खेळताना गुजरातसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग गुजरातने १७.५ षटकात २ विकेट्स गमावत पूर्ण केला. गुजरातकडून साई सूदर्शन आणि जोस बटलर यांनी चांगला खेळ केला. साई सुदर्शनने ३६ चेंडूत ७ चौकार, १ षटकारांच्या मदतीने ४९ धावा, जोस बटलरने आक्रमक खेळ दाखवत ३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावा तर शेरफेन रदरफर्डने १८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा काढल्याने गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा दणदणीत पराभव केला.
दमदार सांघिक खेळाच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दणदणीत विजय साकारला. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत बंगळुरूला १६९ धावातच रोखले. छोट्या स्टेडियमवर जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी मॅरेथॉन भागीदारी साकारत गुजरातच्या विजयाचा पाया रचला. सुदर्शनचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. पण बटलरने मनमुराद फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिल झटपट बाद झाला. पण यानंतर साई सुदर्शन-जोस बटलर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७५ धावांची भागीदारी करत बंगळुरूच्या गोलंदाजांना निरुत्तर केले. हेझलवूडने सुदर्शनला बाद केलं. सुदर्शन बाद झाल्यावर बटलरने सामन्याची सूत्रे हाती घेतली. शेरफन रुदरफोर्डने त्याला चांगली साथ देत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आयपीएलच्या १४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले. एम. चिन्नास्वामी स्टेडियम हा सामना रंगला. या सामन्यात जीटीचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा केल्या आणि गुजरातला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य दिले.
बंगळुरूकडून फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी सलामीला फलंदाजी केली. सॉल्टचा सुरुवातीलाच बटलरकडून झेलही सुटला. पण हे जीवदान फार महागात पडले नाही. गुजरातविरुद्ध आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे अव्वल फलंदाज विराट कोहली, देवदत्त पडिकल, फिल साल्ट आणि कर्णधार रजत पाटीदार लवकर बाद झाले. यानंतर, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा आणि टिम डेव्हिड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर, आरसीबीने २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा केल्या.
आरसीबीचा स्टार फलंदाज आणि सलामीवीर विराट कोहली गुजरातविरुद्ध मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि तो ६ चेंडूत ७ धावा काढून बाद झाला. कोहलीला अर्शद खानने बाद केले. देवदत्त पडिक्कल ४ धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. सिराजने साल्टला १४ धावांवर बाद केले. कर्णधार रजत पाटीदारला इशांत शर्माने १२ धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. ३३ धावांवर साई किशोरच्या चेंडूवर जितेश शर्माला तेवतियाने झेलबाद केले. या सामन्यात कृणाल पंड्या ५ धावांवर बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोनने ३९ चेंडूत सलग दोन षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. पण तो ५४ धावा काढल्यानंतर झेलबाद झाला. फिल सॉल्टने १८ चेंडूत ३२ धावांची जलद खेळी केली. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बोल्ड केले. शेवटच्या षटकात टीम डेव्हिडने आक्रमण केले. त्याने १६ धावा चोपल्या. पण अखेर शेवटच्या चेंडूवर त्याला प्रसिद्ध कृष्णाने त्रिफळाचीत केले. टीम डेव्हिडने १८ चेंडूत ३२ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरूच्या २० षटकात ८ बाद १६९ धावा झाल्या. गुजरातकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली आणि सर्वाधिक ३ बळी घेतले तर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या.