सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनामध्ये ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा व नंतरच भरती प्रक्रिया राबवा, अन्यथा कर्मचारी संघटनेला महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा लेखी इशारा महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते तसेच नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री, राज्याचे नगर सचिव व उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
नवी मुंबई महापालिका स्थापन एक ठोक मानधनावर सद्यस्थितीत अनेक कर्मचारी लिपिक, शिक्षक, लेखा लिपिक, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, औषध निर्माता, एन एम तापमान, वाहन चालक, स्थापत्य, अभियंता अशा विविध संवर्गात कार्यरत आहे. गेली दहा ते पंधरा वर्ष हे कर्मचारी इमानेइतबारे तुटपुंज्या वेतनावर आपली सेवा देत असून प्रत्येक सहा महिन्यांनी विभाग प्रमुख त्यांची सेवा समाधानकारक आहे व त्यांच्या सेवेची महापालिकेला आवश्यकता आहे, असे प्रमाणित करत असतात. कृपया वर संदर्भात न्यायालय निर्णयाकडे लक्ष द्यावे. वरील दोन्ही विशेष रजा याचिका एकत्रित करून न्यायालयाने निर्णय दिला असून सेवेत दहा वर्षे किंवा अधिक वर्षे झालेल्या ठोक मानधनावर ते कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वरील दोन्ही प्रकरणात दिला आहे. याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेत सेवेत दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ समाधानकारक सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वय उलटून गेल्याने इतरत्र नोकरी मिळू शकणार नाही व अतिशय कमी उत्पन्न असल्याने आर्थिक अडचणीमुळे त्यांची ससेहोलपट होत आहे. यामुळे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना न्यायोचित नियमित करावे. या बाबत निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करावी अन्यथा कामगार संघटना उग्र आंदोलन करेल असे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.