• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2025

‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ कार्यक्रमानंतर  डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ कार्यक्रमानंतर  डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम

 

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ‘वेव्हज् २०२५’ अंतर्गत ‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सांगीतिक कार्यक्रमानंतर डॉ. डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम

रस्त्यावरून २ टन व स्टेडियम परिसरातून ५.५ टन कचरा संकलन रात्रीच राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सकाळी रस्ते स्वच्छ दिसले आणि नागरिकांनी व्यक्त केले समाधान

स्वच्छ शहर ही नवी मुंबईची देशभरात ओळख असून त्यादृष्टीने डी. वाय. पाटील स्टेडियम येथे ‘वेव्हज् २०२५’ अंतर्गत संपन्न झालेल्या जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांच्या ‘वंडरमेट’ या वैश्विक प्रीमियर लाईव्ह संगीतमय कार्यक्रमाप्रसंगी हजारो दर्शक उपस्थित होते. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमानंतरच्या स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसर स्वच्छतेचे पूर्वनियोजन केले होते.

त्यास अनुसरून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ एक उपायुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांनी याकडे विशेष लक्ष देत या परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम राबविली.

या मोहिमेमध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे व स्वच्छता अधिकारी  नरेश अंधेर यांच्यासह ४ स्वच्छता निरीक्षक, ३ स्वच्छता पर्यवेक्षक व ५४ स्वच्छतामित्रांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्याचप्रमाणे त्यांनी संकलित केलेला कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यासाठी ३ टाटा एस कचरा वाहतूक वाहने कार्यरत होती. त्यावर कचरा वाहतूक व्यवस्थापक आणि ९ स्वच्छताकर्मींनी लगेचच कचरा वाहून नेला.

स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसरातून २ टन कचरा संकलित करून उचलण्यात आला. यामध्ये प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण अधिक होते. त्याचप्रमाणे डॉ. डी वाय पाटील स्टेडियमच्या आतील भागात १० टन क्षमतेचे लार्जर कॉम्पॅक्टर वाहन उभे करण्यात आले होते. त्यामध्येही ५.५ टन कचरा संकलित करण्यात आला. तो देखील भरून प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच पूर्वनियोजन करून रात्रीच राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सकाळी स्वच्छ रस्ते पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

Previous Post

अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा कोलकातावर एका धावेने विजय

Next Post

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सेवा हक्क दिन उत्साहात

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सेवा हक्क दिन उत्साहात

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सेवा हक्क दिन उत्साहात

लखनौचा पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सर्वोच्च स्थानी

लखनौचा पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सर्वोच्च स्थानी

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com