• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2025

लखनौचा पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सर्वोच्च स्थानी

adminbyadmin
in देश - विदेश
0
लखनौचा पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सर्वोच्च स्थानी

 

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

धरमशाळा : पंजाब किंग्सने धरमशालाच्या घरच्या मैदानावर लखनौचा धावांनी मोठा पराभव केला आहे. पंजाबने दणदणीत विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलंय. तर लखनौ संघाला आता प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर रस्ता खूप अवघड असणार आहे. पण पंजाबविरूद्ध आयुष बदोनीने लखनौकडून एकट्याने कमालीच्या धावा केल्या.

पंजाब किंग्सने दिलेल्या २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवात खूप खराब झाली. अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स घेत लखनौच्या मुख्य ३ फलंदाजांना माघारी धाडलं आणि लखनौच्या धावांना ब्रेक लावला. मिचेल मार्श आणि ए़डन मारक्रम तिसऱ्या षटकात बाद झाले तर निकोलस पुरन पाचव्या षटकात बाद झाला. हे तिन्ही विकेट अर्शदीपने घेतले. ऋषभ पंतने यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो १८ धावा करत बाद झाला, तर डेव्हिड मिलर ११ धावा करत बाद झाला. यानंतर आयुष बदोनी आणि अब्दुल समद यांनी संघासाठी भागीदारी रचली. अब्दुल समद २४ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावा करत बाद झाला. तर आयुष बदोनीने वादळी खेळी करत लखनौचा डाव सांभाळला. बदोनीने ४० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. तर आवेश खान १० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३ विकेट्स, अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतले. मार्कोयान्सन व चहलने १-१ विकेट घेतली.

लखनौने नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबच्या फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी करत २० षटकांत २३६ धावांचा टप्पा गाठला. प्रियांश आर्य पहिल्याच षटकात बाद झाला. पण प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. तर जोश इंग्लिस १४ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३० धावा करत बाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंग ४८ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ९१ धावा करत बाद झाला. अवघ्या काही धावांनी त्याचं शतक हुकलं.

श्रेयस अय्यरने २५ चेंडूत २४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. तर नेहाल वधेरा १६ धावा करत बाद झाला. शशांक सिंगने विस्फोटक फलंदाजी करत १५ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकारांसह ३३ धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात योगदान दिलं. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठीने २-२ विकेट्स घेतले. तर प्रिन्स यादवने १ विकेट घेतली.

Previous Post

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सेवा हक्क दिन उत्साहात

Next Post

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

Next Post
आज बारावीचा निकाल होणार जाहीर

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

गोकुळचे दुध महागले! गायीचे ५८ रुपये तर म्हशीचे ७४ रुपये लीटर

गोकुळचे दुध महागले! गायीचे ५८ रुपये तर म्हशीचे ७४ रुपये लीटर

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

प्रभाग ७६ मधील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची भाजयुमोची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com