सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहरातील वृक्षसंपदेत भर घालावी यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या अमृत वृक्ष लागवड व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत बेलापूर विभागात सेक्टर 8 धारण तलाव परिसरात देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावर्षी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबईच्या जैवविविधेत वाढ होण्याकरिता पशूपक्ष्यांचा अधिवास राहील अशा देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात येत आहे. अशाच प्रकारे जांभूळ, बकुळ, पेरू, सीताफळ, काजू अशा २५ नग फळवृक्षांची लागवड बेलापूर विभागात सेक्टर 8 धारण तलाव परिसरात उद्यान विभागाचे परिमंडळ १ उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये अनुलोम या स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



