ठाणे : ऍथलिड्सतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पहिल्या यंगइंडिया मिनिथॉन स्पर्धेत ७.१ किलोमीटर अंतराच्या मुख्य शर्यतीत पुरुषामध्ये निलेश अर्सेकर आणि महिलांमध्ये ख़ुशी सिंगने बाजी मारली. तर १९ वर्षे वयोगटाच्या ५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत संतोष शिंदे आणि गायत्री शिंदे हे अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजेते ठरले.
ठाण्यातील वृदावन बस स्थानकाजवळून सुरु झालेल्या या मिनिथॉन शर्यतीत सुमारे १२०० हुन अधिक धावपटू सहभागी झाले होते. त्यात पुढच्या रविवारी होणाऱ्या ठाणे मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर बहुतेक धावपटूंनी या स्पर्धेकडे सर्व स्पर्धा म्हणून महत्व दिले होते. त्यामुळे चांगल्या रंगतदार शर्यती अनुभवायला मिळाल्या. पुरुषामध्ये विजेत्या ठरलेल्या निलेशने अवघ्या ३३ मिलीसेकंदाच्या फरकाने सूरज झोरेला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. निलेशने ही शर्यत २१.५३ मिनिटात पूर्ण केली तर दुसऱ्या स्थानी राहिलेल्या सुरजने २२.२६ मिनिटे अशी वेळ नोंदवली. कल्पेश देवरे २२.३३ मिनिटे अशा कामगिरीसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
महिलांच्या शर्यतीतही ख़ुशीने वर्चस्व राखताना साक्षी पवारला ३५ सेकंदाच्या फरकाने पाठी टाकले. खुशीने शर्यत जिंकताना ३०.३४ मिनिटे अशी वेळ नोंदवली. साक्षीने ३१.०९ सेकंदात हे तर धावून पार केले. मोहिनी सिंगने ३१.१९ मिनिटे अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शर्यतींना झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल
१९ वर्षे वयोगट ( ५ किलोमीटर): मुले – संतोष शिंदे (१५.२० मिनिटे), हरिओम सिंग (१५.२१ मिनिटे), शिरीष बोडके (१५.३६ मिनिटे),
मुली – गायत्री शिंदे (१९.५ मिनिटे), हुमेरा सय्यद ( १९.२५ मिनिटे), मयुरी चव्हाण (२०.११ मिनिटे).
१५ वर्षे वयोगट : (३ किलोमीटर ) मुले- संकेत नागरे (९.५० मिनिटे), सोपान पवार (९.८५ मिनिटे) ईशान शर्मा (१०.१५ मिनिटे).
मुली – एचछा राजभर (१२.१४ मिनिटे), अनुष्का माझी (१२.१६ मिनिटे), अल्यास लोपेझ (१२.१८ मिनिटे).
१२ वर्षे वयोगट : ( १ किलोमीटर) मुले- अवधूत सुर्वे ( ३.३१ मिनिटे), आराध्य पाटील (३१.३४ मिनिटे), यश पालवी (३.४४ मिनिटे).
मुली : ओवी पाटील ( ७.३० मिनिटे), तेजस्विनी जोंधळे ७.०९ मिनिटे ), चेलसा नाडर (७.१०)



