• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 12, 2025

नशेडीच्या भितीने मोकळा भुखंड बंदीस्त करण्यास रहिवाशांचा सिडकोला विरोध

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नशेडीच्या भितीने मोकळा भुखंड बंदीस्त करण्यास रहिवाशांचा सिडकोला विरोध
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसर हा नशेडींचे माहेरघर बनलेला आहे. त्यातच हिमालय व वरुणा या सिडकोच्या सोसायटीच्या मध्यभागी असणारे भुखंडावर चारही बाजूने पत्रे लावून बंदीस्त करण्याचे काम सिडकोने ठेकेदारांच्या माध्यमातून सुरु केले असताना स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध केला आहे. उद्या हे नशेडी पत्रे वाकवून त्यात बसण्याची भीती असून नशेडींसाठी आणखी एक सुरक्षित ठिकाण बनवू नका, असा संताप स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान, पुुर्नविकासासाठी गेलेल्या सिडकोच्या एव्हरग्रीन सोसायटीचा आतील भाग, सागरदीप सोसायटी ते दत्तगुरु टॉवरसमोरील पदपथ, शिवम व सागरदीप सोसायटीच्या मध्यभागी असलेले महावितरणचे उपकेंद्र या ठिकाणी नशेडींचा खुलेआमपणे वावर असतो. लहान मुलांकडून मोबाईल अथवा पैसे लुटणे, उद्यानालगत असलेल्या शौचालयात लघुशंकेसाठी येणाऱ्या रिक्षाचालकांना लुटणे, मध्यंतरी त्याच शौचालयात रिक्षाचालकाला मारहाण व शारिरीक इजाही करण्याची घटना घडली आहे. महावितरणच्या उपकेंद्रात येणाऱ्या नशेडींनी तर एका  लहान मुलाचा मोबाईल चोरण्यासाठी दुचाकीवरुन थेट त्याचे अपहरण करण्याचा प्रकार केला होता. स्थानिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उधळला गेला. काही महिन्यापूर्वी तुलसीविहार इमारतीत दुर्घटना झाल्यापासून ही सोसायटी बंदच आहे. त्या सोसायटीतील सदनिकेमधील लोखंडी संरक्षक ग्रील व जाळ्याही नशेडींनी काढून विकल्या आहेत. नेरूळ सेक्टर सहा परिसर हा गेल्या काही महिन्यापासून नशेडींचे माहेरघर बनला असून संबंधित ठिकाणी खुलेआमपणे त्यांचा वावर असतो.
सुरुवातीच्या काळात सिडकोच्या नकाशामध्ये वरुणा व हिमालय सोसायटीच्या मध्यभागी मोकळ्या असलेल्या भुखंडावर मार्केटचे आरक्षण दाखविण्यात येत होते. सेक्टर सहा व सारसोळे गावातील जुन्या लोकांकडे तसे पुरावेही आहेत. अचानक त्या भुखंडावरुन मार्केट कोठे गायब झाले, तेच गौडबंगाल आहे. स्थानिकांना पालिकेचे एक क्रिडांगण, दत्तगुरु व सागरदीप सोसायटीच्या मध्यभागी असलेला चार गुंठेचा प्लॉट आणि हिमालय व वरुणा सोसायटीच्या मध्यभागी असलेले हे दोन प्लॉट वगळता सामाजिक कार्यासाठी अन्य कोणतीही जागा उपलब्ध नाही. सिडकोने या प्लॉटची विक्री न करता मार्केट व व्यायामशाळेसाठी हे भुखंड महापालिकेकडे हस्तांतरीत करावे यासाठी स्थानिक भागातील राजकीय व सामाजिक घटकांकडून महापालिका व सिडकोकडे लेखी पाठपुरावाही सुरु आहे.
मंगळवारी सकाळी वरुणा व हिमालय सोसायटीच्या मध्यभागी असलेले प्लॉट बंदीस्त करण्यासाठी मजुर आले व त्यांनी खोदकाम सुरु केले. हे पाहताच स्थानिक रहीवाशांनी राजकीय घटकांना याची कल्पना दिली. खोदकाम ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी प्रल्हाद पाटील यांच्यासह काही राजकीय घटक त्या ठिकाणी आले. त्यांनी संबंधित काम करणाऱ्या वाशी गावातील ठेकेदाराला संपर्क करुन मोकळी जागा पत्रे लावून बंदीस्त केल्यास, ते पत्रे तोडून नशेडी आत येऊन  नशेडींचा उपद्रव वाढण्याची भीती व्यक्त केली. ही जागा बंदीस्त न करण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राजकीय घटकांकडून व स्थानिक रहीवाशांकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी बंदीस्त जागा केल्यास नशेडींकडून दुर्घटना घडल्यास त्यास वाशी गावातील ठेकेदार व सिडको जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक रहीवाशांकडून देण्यात आला आहे. 
Previous Post

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

Next Post

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे, बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

Next Post
‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे, बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे, बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार

पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मंत्री  नितेश राणे यांचा जोरदार दणका

यंदा गणपतीनिमित्त कोकणवासीयांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’चा डबल धमाका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com