• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2025

राजकीय हेतूने अभिप्रेत असलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राजकीय हेतूने अभिप्रेत असलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिका प्रभागांमध्ये जवळपास अंदाजे 600 ते 650 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरुन व विविध वृत्तवाहिन्यांवरुन समजले. मुळातच नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे. तीन महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असतानाच महापालिका प्रशासनाने माजी नगरसेवकांच्या निर्देशानुसार विकासकामांना सुरुवात होणार असल्याचा बातम्यांमध्ये उल्लेख आहे. मुळातच महापालिका प्रशासनात गेली काही वर्षे प्रशासक असून जनतेला हवी असलेली विकासकामे, नागरी समस्यांचे निवारण, नागरी सुविधांची उपलब्धता प्रशासकांच्या माध्यमातून व्यवस्थित होत आहेत. ही सुरु होणारी विकासकामे म्हणजे माजी नगरसेवकांच्या अर्थकारणाला पाठबळ व जनसामान्यांमध्ये कामाचे श्रेय घेण्याची संधी असा दुहेरी हेतू माजी नगरसेवकांचा साध्य होणार आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीशी प्रतारणा असून निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. येऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी राजकीय स्वार्थांने अभिप्रेत  असलेली ही विकासकामे प्रशासनाने तात्काळ रद्द करुन निवडणूका झाल्यावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकासकामे करण्याची मागणी जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव : हर्षवर्धन सपकाळ

Next Post

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा : मनसेची मागणी

Next Post
निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा : मनसेची मागणी

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा : मनसेची मागणी

बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार : पालकमंत्री नितेश राणे

बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार : पालकमंत्री नितेश राणे

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास महापालिकेची उदासिनता

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास महापालिकेची उदासिनता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com