जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील रस्त्यावर खड्डे पडल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी करुनही खड्डे बुजविण्यास महापालिका प्रशासन उदासिनता दाखवित असल्याने खड्डे वाढत चालला असून वरुणा या सिडको सोसायटीच्या छोट्या प्रवेशद्वारालगतचा रस्ता काही प्रमाणात खचल्याचेही दिसत आहे.
सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. नेरूळ सेक्टर सहा परिसरातही अंर्तगत व बाह्य रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत रस्त्याची डागडूजी व्हावी व खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार सातत्याने महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग कार्यालय यांच्याकडे लेखी तक्रारी करत आहेत. खड्डे बुजविण्यास व रस्त्याची डागडूजी करण्यास महापालिका प्रशासनाने उदासिनता दाखविल्याने वरुणा सोसायटीच्या प्रवेशद्वारालगतचा रस्ता काही प्रमाणात खचला असून खड्डाही वाढत चालला आहे. या खड्ड्यांमुळे परिसराला बकालपणा आला असून पावसाचेही पाणीही तेथे साचत आहे. महापालिकेच्या खड्डे बुजविण्याच्या उदासिनतेबाबत स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.



