• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 30, 2025

दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणाऱ्या इसमांवर कारवाई

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणाऱ्या इसमांवर कारवाई
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर 35 हजारहून अधिक दिवाबत्तीचे खांब बसविण्यात आले असून त्यामध्ये वाशी लिंक रोड तसेच ठाणे बेलापूर महामार्गावरील दिवाबत्तीच्या खांबामधील तांब्याची तार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत वाशी पोलीस ठाण्यात 10 दिवसापूर्वी एनसी तक्रारही नोंदविण्यात आली होती. महापालिका विद्युत विभागाच्या वतीने दिवाबत्तीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विभागवार एजन्सीजची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दिवसातून दोन ते तीन वेळा दिवाबत्तीच्या खांबांची एजन्सीच्या कामगारांकडून पाहणी करण्यात येत असते.
यामध्ये सायन पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्यापुढे वाशी गावाजवळचा भाग तसेच बेलापूर उड्डाणपूलाजवळील भाग तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील काही भाग येथील दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरीला गेल्याची बाब नमुंमपा विद्युत विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या भागात अधिक सतर्कता बाळगण्यात आली.
यामध्ये 27 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 च्या सुमारास ठाणे बेलापूर रोड वरील कोकीलाबेन हॉस्पिटलजवळ दुभाजकामधील दिवाबत्तीच्या खांबांवरील तांब्याची तार दोन इसम काढत असल्याचे या भागातील दिवाबत्तीची देखभाल व दुरुस्ती करणा-या मे. चैतन्य इलेक्ट्रिकल या एजन्सीच्या कामगारांच्या निदर्शनास आले. या चोरी करणा-या माणसांमधील एक व्यक्ती पळून गेला व एका व्यक्तीस चोरी केलेल्या 48 मीटर तांब्याच्या तारेसह ताब्यात घेण्यात आले. त्याची रितसर एफआयआर तक्रार मे. चैतन्य इलेक्ट्रिकल यांच्यामार्फत तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.
एका दिवाबत्तीच्या खांबामध्ये साधारणत: 48 मीटर लांब तांब्याची तार वापरली जाते. अशाप्रकारच्या 60 दिवाबत्ती खांबांमधील साधारणत: 2880 मीटर लांबीची तार चोरीला गेल्याचे पाहणीअंती निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या चोरीमुळे या भागातील दिवाबत्तीवर परिणाम होत असून पथदिवे सुरु नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. विशेषत्वाने बेलापूर उड्डाणपूलाखालील बसस्टॉप तसेच वाशी गावाजवळील बसस्टॉप येथून जास्त प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे दिवाबत्ती सुरू नसल्याने या भागात काळोख झाल्याने रहदारीला अडचण होऊन अपघाताचा धोका संभवतो तसेच अनुचित प्रकार घडण्याची संभाव्य शक्यताही व्यक्त केली जात होती.
त्या अनुषंगाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता श्री. प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका विद्युत अभियंते व देखभाल दुरुस्ती करणा-या एजन्सीचे कर्मचारी यांचेमार्फत अधिक काटेकोरपणे दक्षता घेण्यात आली. यामुळे दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करतांना पकडलेल्या व्यक्तीस तुर्भे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे महानगरपालिकेच्या अधिकृत एजन्सीमधील कामगारांव्यतिरिक्त कुणी अपरिचीत व्यक्ती दिवाबत्तीच्या खांबानजिक काही कृत्य करतांना दिसल्यास कृपया 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन सहकार्य करावे.
Previous Post

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास महापालिकेची उदासिनता

Next Post

उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊड जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post
उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊड जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊड जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com