• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 31, 2025

उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊड जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊड जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील नेरूळ सिवह्यू उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊंड जाहीर करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सर्वप्रथम आम्ही आपणास नेरूळ सेक्टर सहामधील जनतेच्या व सारसोळे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने नेरूळ सेक्टर सहामध्ये असणाऱ्या सुश्रुषा रुग्णालयासमोरील बाजूस असलेल्या नेरूळ सिव्ह्यू उद्यान पाहणी अभियानाकरीता निमंत्रित करत आहोत. आपण अचानक न सांगता भेट दिल्यास आपणास आमच्या म्हणण्यामागील गांभीर्य, कळकळ व तळमळ समजून येईल. या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच पालिका कर्मचाऱ्यांकडून बाराही महिने कचऱ्याचे ढिगारे लावलेले पहावयास मिळतात. या दुर्गंधीचा पदपथावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व बाजूच्या सिव्ह्यु सोसायटीतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या कचऱ्यामुळे रात्रीच्या वेळी डासांचा उद्रेक झालेला स्पष्टपणे दिसून येतो. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने आजवर खर्च खुप केला आहे. पण त्याचा उपयोग काय झाला? हा प्रश्न स्थानिक रहीवाशांना पडला आहे. परिसरातील दहा नागरिकही त्या उद्यानात जात नाही. उद्यानात कोणत्याही सुविधा नाही. मग उद्यानासाठी निधी कोठे वापरला? त्याचा काय उपयोग झाला? याचा महापालिकेने शोध घेणे आवश्यक असल्याचे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

आपण पालिकेवर प्रशासक आहात. नवी मुंबई शहराची जबाबदारी आपणाकडे आहे. कचऱ्याचे ढिगारे हटविल्यास व त्या उद्यानात कचरा न साठविल्यास दुर्गंधीचा व डासांचा त्रास होणार नाही. आपण स्वत: या उद्यानाला भेट देवून उद्यान स्थानिक रहिवाशांना वापरण्यायोग्य बनविण्याचे आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेले कचऱ्याचे ढिगारे हटविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणाऱ्या इसमांवर कारवाई

Next Post

दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

Next Post
दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com