• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 1, 2025

दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील कंत्राटी विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी संपली तरी बोनस (सानुग्रह अनुदान) न मिळाल्याच्या प्रकाराची चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या संपादक सौ. सुवर्णा खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

दिवाळी संपून दहा दिवस लोटले तरी महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळणारा बोनस (सानुग्रह अनुदान) अजूनही मिळालेले नाही. स्वमालकीचे धरण असणाऱ्या व महाराष्ट्रात सधन म्हणून गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला ही बाब भूषणावह नाही. दिवाळी संपल्यावरही सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून बोनस मिळालेला नाही, बोनस न मिळालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. नेरूळमधील अनेक सफाई कामगार आजही बोनसपासून वंचित आहेत. महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची बॅंक खाती तपासल्यास आजही मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बोनस (सानुग्रह अनुदान) मिळाला नसल्याचे दिसून येईल. सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडे बोनसबाबत विचारणा केल्यास, पालिकेकडून अजून बिल मिळाले नाही, तुम्हाला जे करायचे ते करा अशी उर्मटपणे उत्तरे ठेकेदाराकडून देण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने दिवाळी लक्षात घेता कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस तातडीने देणे आवश्यक होते. जर पालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस दिला असेल व ठेकेदारांने कामगारांना बोनस न देता इतरत्र वळविला असेल तर यामुळेही प्रशासनाची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे. बोनसबाबत प्रशासन विभागाकडून खातरजमा करुन घ्यावी. सफाई कर्मचाऱ्याच्या किती ठेकेदारांची बिले देण्यात आलेली नाहीत याचीही खातरजमा करुन घ्यावी. याबाबत पालिका प्रशासनाने लेखी स्पष्टीकरण जाहीर करणे आवश्यक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी संपल्यावरही बोनस न मिळालेल्या प्रकरणाची चौकशी करावी. ज्याची बोनसबाबत बिले दिली नसतील ती तातडीने वितरीत करावी व ज्या ठेकेदारांना दिवाळीची बिले देवूनही त्यांनी कामगारांना बोनस दिला नसेल तर त्या ठेकेदारावर गु्न्हा दाखल करुन त्याला काळ्या यादीत टाकावे व पुन्हा महापालिकेचा कोणताही ठेका त्या ठेकेदाराला देवू नये. दिवाळी बोनसपासून वंचित असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर बोनस मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुवर्णा खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

उद्यानात स्वच्छता ठेवायची नसेल तर डम्पिंग ग्राऊड जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

Next Post
गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com