• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 4, 2025

भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

adminbyadmin
in रायगड
0
भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

उरण (प्रतिनिधी : भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय येतील आणि झोपड्या बांधून मोठे होतील, आपण आपल्या वाढत्या गरजेनुसार घरे बांधली पाहिजेत, सिडको वा अन्य यंत्रणा तोडेल, याचा विचार करण्यापेक्षा आम्ही पिढ्यांनपिढ्या वास्तव्य करणारे येथील भूमिपुत्र आहोत, आम्हाला वाढत्या गरजेनुसार घरे बांधण्याचा अधिकार आहे, भूमिपुत्रांची शेकडो एकर गुरचरण जमीन सिडकोने फुकटात गिळंकृत केली आहे, मात्र आमच्या भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत ठरवून तोडली जात असतील तर ते योग्य नाही. उद्या येथे परप्रांतीय येऊन झोपड्या बांधतील आणि सरकार त्या झोपड्या अधिकृत करेल, हा अलीकडचा इतिहास आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनो, वेळीच सावध व्हा. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावून कटिबद्ध होऊ या, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी धुतूम येथे व्यक्त केले.

रविवारी  धुतूम ग्रामपंचायतीच्या वतीने साकव आणि क्रिकेट टर्फच्या उद्घाटनप्रसंगी महेंद्रशेठ घरत बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले, धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगले काम करीत आहेत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला त्या पात्र ठरल्या आहेत. धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामे होत आहेत. जो चांगले करेल त्याच्यासोबत जनता असते.
धुतूम या हुतात्म्यांच्या गावाला क्रिकेट खेळाडूंसाठी मैदान मिळावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचा सतत पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने धुतूम गावासाठी मैदान उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही महेंद्रशेठ घरत यांनी दिली.
धुतूम ग्रामपंचायतीचे काम उत्तम आहे. पर्यावरण रक्षणाची भूमिका कौतुकास्पद आहे. मी जगभर फिरतो, परंतु सध्या आपल्याकडे जो वातावरणात बदल झाला आहे, तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले.
यावेळी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, माजी सरपंच शंकरशेठ ठाकूर, उपसरपंच सुचिता कडू, सदस्य रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, सदस्या स्मिता ठाकूर, कविता पाटील, अनिता ठाकूर, करिष्मा ठाकूर, ग्रामसेवक नागनाथ घाडगे, उरण तालुका महिला इंटक अध्यक्ष कल्पना ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण पाटील, अनंत ठाकूर, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष महेश ठाकूर तथा श्याम ठाकूर, नंदकुमार ठाकूर, किशोर पाटील, चंद्रहास ठाकूर, वामन ठाकूर, हरी ठाकूर, मनोज ठाकूर, काशिनाथ पाटील, राजन कडू, शरद ठाकूर, सुजित ठाकूर, नीलेश ठाकूर आणि धुतूम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

Next Post

सानपाडा नोडमध्ये धुरीकरण राबविण्याची भाजपची मागणी

Next Post
तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

सानपाडा नोडमध्ये धुरीकरण राबविण्याची भाजपची मागणी

एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com