• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, April 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2026

मुंबईमध्ये कबड्डी स्पर्धांसाठी ‘स्वस्तात’ मैदाने होणार उपलब्ध

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राजगुरुनगर येथे राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात या खेळाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबईत मैदाने कमी होत चालल्याने कबड्डी स्पर्धांवर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेच्यावतीने कबड्डी स्पर्धेसाठी अल्प दरात मैदाने उपलब्ध करून देण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे.

मुंबईतील मध्यमवर्गीय व गिरणगाव परिसरातील अनेक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तरीही, सध्या योग्य मैदाने उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंच्या सरावात अडथळे निर्माण होत आहेत. सरावाचा अभाव, दुखापतींचे वाढते प्रमाण आणि पारंपरिक मातीत खेळल्या जाणाऱ्या कबड्डीऐवजी कृत्रिम मॅटवरील स्पर्धांचे वाढते प्रमाण, यामुळे खेळाडूंच्या नैसर्गिक कौशल्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई शहर व उपनगरांतील कबड्डी संघटनांना स्पर्धा आयोजित करण्यासाठी खासगी जागांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे स्पर्धांचे आयोजन कमी प्रमाणात होत असून नवोदित खेळाडू तयार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आपल्या अखत्यारितील क्रीडांगणे कबड्डी स्पर्धांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापालिका सभागृहात केली होती. या ठरावाच्या सुचनेला मंजुरी महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे याबाबत ठरावच महापालिका सभागृहात संमत करण्यात आला असून प्रशासन आता यासाठी धोरणात्मक निर्णय कशाप्रकारे घेतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत बोलताना सचिन पडवळ यांनी, महापालिकेने सकारात्मक निर्णय घेतल्याने मराठमोळ्या मातीतला हा पारंपरिक खेळ अधिक जोमाने फुलेल, नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. तसेच मुंबईतून पुन्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Previous Post

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप शिवसेनेची मंजुरी, कशी भरणार महापालिकेची तिजोरी?

Next Post

नवी मुंबई महापालिकेतर्फे सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नवी मुंबई महापालिकेतर्फे सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगावमध्ये स्वच्छता अभियान

डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगावमध्ये स्वच्छता अभियान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com