• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 28, 2026

नवी मुंबई महापालिकेतर्फे सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये राहणार सुरु

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ एक महिना शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील ८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व गुढीपाडवा, श्रीराम नवमी आणि महावीर जयंती या सार्वजनिक सुट्टींच्या दिवशीही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.

नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी ८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून तेथे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालकेची वेबसाईट, My NMMC ॲप, सर्व बँकांचे डेबिट कार्ड, आरटीजीएस, सर्व प्रकारच्या यूपीआय सुविधा याव्दारे ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही महापालिका कार्यालयात अथवा कर संकलन केंद्रात जावे न लागता भरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवरून कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता मालमत्ता कर विभागाच्या वतीने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आलेली असून, थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा तसेच थकबाकीदारांवर होणारी कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत मालमत्ता कर विहित वेळेत भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

मुंबईमध्ये कबड्डी स्पर्धांसाठी ‘स्वस्तात’ मैदाने होणार उपलब्ध

Next Post

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com