संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व नागरिकांसाठी वाचनालयाची मागणी मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
लहान घरांमध्ये राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करण्यासाठी जागेची कमतरता भासते. ही अडचण ओळखून नगरसेवक अभिजीत देसाई यांनी प्रभागातील गणेश मैदान, सेक्टर २३, जुईनगर – सुसज्ज अभ्यासिका आणि सानपाडा सेक्टर ११ – वाचनालय आणि अभ्यासिका तसेच नेरूळ सेक्टर ४ (शाळा क्र. १०२) – विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांसह स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि त्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच या प्रक्रियेला गती मिळेल, असा आशावाद नगरसेवक अभिजीत देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
