• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, April 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 21, 2026

नेरूळ सेक्टर २८,३० मधील समस्या निवारणासाठी शिवसेनेचे महापालिकेसह पोलीस आयुक्तांना साकडे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये मोफत घरे देण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २८ (जुना) व सेक्टर ३० (नवीन) परिसरात वाढलेल्या व्यसनाधीनांच्या उपद्रव, अस्वच्छता व सुरक्षेच्या प्रश्नांवर तात्काळ कारवाई करण्याची लेखी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त, नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

जुना सेक्टर २८ तसेच नवीन सेक्टर ३० या परिसरातील मोकळ्या भूखंडांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन व्यक्तींचा वावर वाढलेला असून, गांजा सेवन, दारू पिणे, तसेच इतर बेकायदेशीर कृत्ये उघडपणे सुरु आहेत. यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील महिला, तरुणी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना सतत भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. काही वेळा रात्रीच्या वेळी आरडाओरडा, भांडणे, संशयास्पद हालचाली दिसून येतात, ज्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटचे थोटके, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला असून परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. यामुळे डासांची वाढ, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हे सर्व नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता व सुशोभीकरणाच्या प्रतिमेला धक्का देणारे आहे. तसेच संबंधित भूखंडांचा काही ठिकाणी अनधिकृत वापर, अतिक्रमण व संशयास्पद हालचाली सुरु असल्याचेही निदर्शनास येत असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.

या बाबी भविष्यात मोठ्या गुन्हेगारी घटनांना आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे नेरुळ पोलीस स्टेशनमार्फत नियमित गस्त वाढवून व्यसनाधीन व बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई करावी, संबंधित भूखंडांची तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून कचरा हटविणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखरेख वाढविणे, अंधार असलेल्या ठिकाणी स्ट्रीट लाईट्स बसविणे/दुरुस्ती करणे, मोकळ्या भूखंडांना फेन्सिंग करून अनधिकृत प्रवेश रोखणे, “No Trespassing / व्यसनमुक्त परिसर” असे सूचना फलक लावणे. महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबवून परिसर पूर्णपणे सुरक्षित करणे. आवश्यक असल्यास महिला सुरक्षा पथकाची नेमणूक करणे अशा मागण्या करताना नामदेव भगत यांनी या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सोबतच अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Previous Post

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून सखोल आढावा

Next Post

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाची दमदार कामगिरी

Next Post
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून सखोल आढावा

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाची दमदार कामगिरी

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे : विजया रहाटकर

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे : विजया रहाटकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com