• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, August 30, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 30, 2026

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; झेडपीच्या शाळांना मिळणार ४३६ शिक्षक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; झेडपीच्या शाळांना मिळणार ४३६ शिक्षक

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती; शिक्षक उपलब्धतेचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचणार

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. कागदपत्रांची पडताळणी आणि समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शिक्षकांची रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या १० सप्टेंबरपर्यंत हे शिक्षक संबंधित शाळांमध्ये रुजू होण्याची अपेक्षा असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक उपलब्धतेचे प्रमाण सुमारे ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.

शिक्षकांची कमतरता ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या नियमित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासमोरील महत्त्वाची अडचण मानली जात होती. आता ४३६ शिक्षक उपलब्ध झाल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत होता, त्या ठिकाणी नवीन शिक्षक रुजू झाल्यानंतर शिक्षणाची गती आणि गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळावी, शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने उपलब्ध शिक्षकांना नियुक्तीच्या शाळांवर तातडीने रुजू करून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची माहिती शासनाला देण्यात आली होती. त्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उपशिक्षक तसेच पदवीधर शिक्षक (भाषा आणि विज्ञान) या पदांसाठी शिक्षक उपलब्ध झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण ५९३ रिक्त पदांपैकी ४३६ पदांसाठी शिक्षक उपलब्ध झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला थेट फायदा

शिक्षक उपलब्ध होणे हा केवळ रिक्त पदे भरण्याचा प्रशासकीय निर्णय नसून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. वर्गात नियमित शिक्षक उपलब्ध राहिल्याने अध्यापनातील सातत्य वाढेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींकडे अधिक लक्ष देता येईल आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रक्रिया अधिक बळकट होण्यास मदत होईल.

शिक्षकांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन, विषयानुरूप मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक वातावरण मिळण्याचा मार्गही सुकर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

शैक्षणिक हिताचा निर्णय

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता वाढणे हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने सकारात्मक टप्पा आहे. केवळ शिक्षक नियुक्त होणे पुरेसे नसून, नियुक्त झालेले शिक्षक वेळेत शाळांमध्ये रुजू होऊन विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन मिळणे हा या निर्णयाचा खरा लाभ ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात या शिक्षकांच्या नियुक्तीची आणि प्रत्यक्ष रुजू होण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याला महत्त्व आहे.

अशी होणार नियुक्ती प्रक्रिया

  • जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून पुढील दोन दिवसांत शिक्षक नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार.

  • प्रथम उपलब्ध शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार.

  • त्यानंतर समुपदेशनाच्या माध्यमातून संबंधित शाळांमध्ये नियुक्ती निश्चित केली जाणार.

  • नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत शिक्षक संबंधित शाळांमध्ये रुजू होणार.

झेडपी शिक्षण विभागाची स्थिती

३,५१६ — जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा
१०,६४९ — सध्या कार्यरत शिक्षक संख्या
५९३ — रिक्त शिक्षक पदे
४३६ — पवित्र पोर्टलद्वारे उपलब्ध झालेले शिक्षक
९७ टक्के — नियुक्तीनंतर अपेक्षित शिक्षक उपलब्धता

 

“शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. उपलब्ध झालेले ४३६ शिक्षक तातडीने शाळांमध्ये रुजू झाल्यास त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे.”

— विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

Previous Post

फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा : मंत्री नितेश राणे

Next Post

कांदा महिलांना रडवणार? शंभरीच्या उंबरठ्यावर भाव!

Next Post
कांदा महिलांना रडवणार? शंभरीच्या उंबरठ्यावर भाव!

कांदा महिलांना रडवणार? शंभरीच्या उंबरठ्यावर भाव!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com