• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, September 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2026

‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?: नाना पटोले

adminbyadmin
in मुंबई
0
अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

वसंत गोपाळे :  Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात जास्त महागाई महाराष्ट्रात आहे आणि आता वीज दरवाढीचा शॉक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशासाठी महाजनकोने ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर काढले असून हा कोळसा मोदी-शाह यांच्या मित्रोंच्या खाणीतून घेतला जाणार आहे. हा महागडा कोळसा खरेदी केल्यास वीजेचे दरही वाढतील, त्यामुळे हे टेंडरच रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, आम्ही मागील आठवड्यात कोळशाचा मुद्दा उपस्थित केला होता आता सरकारने आणखी एक टेंडर काढले आहे. ३० लाख मेट्रीक टन कोळशाचे हे टेंडर आहे. आपण WCL कडून चांगल्या प्रतीचा व कमी दरातील कोळसा खरेदी करत होतो, हाच कोळसा गुजरात व कर्नाटकला सुद्धा जातो पण पंतप्रधानांच्या मित्रोंला फायदा पोहचवण्यासाठी हे टेंडर काढले आहे. टेंडरमध्ये स्पर्धा असेल तर कमी दरात कोळसा खरेदी करता येतो व त्याचा फायदा जनतेला होतो, पण आता ही स्पर्धाच ठेवली नसून थेट खास व्यक्तीच्या खाणीतून हा कोळसा खरेदी केला जाणार आहे. स्पर्धा संपल्याने महागडा व कमी दर्जाचा कोळसा घ्यावा लागणार आहे. कोल वॅाशरीकडे ५ लाख मेट्रीक टन कोळसा पडून आहे, तो कोळसा सरकार का घेत नाही. सरकार महाग व कमी दर्जाचा कोळसा खरेदी करणार व नंतर वीजेचे दर वाढणार, ही जनतेची लूट आहे. ती थांबली पाहिजे यासाठी हे टेंडर रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

 यासंदर्भात मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ३३ मोठे उद्योग बाहेर गेले आहेत, त्याला कारण महाराष्ट्रातील महागडी वीज आहे. गुजरात व कर्नाटकात आपल्यापेक्षा कमी वीज दर आहेत. उद्योग राज्याबाहेर गेल्याने त्याचा फकटा आपल्याला बसतो, बेरोजगारीत वाढ झाली आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

 

पंतप्रधानांकडून जीडीपीचे खोटे आकडे..

देशाचा जीडीपी ७.८ टक्के असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडीयावर टाकून केला आहे. पण पंतप्रधानांनी सांगितलेला जीडीपीचा दर खोटा असल्याचे या विषयातील तज्ञच सांगत आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेती संकटात आहे मग जीडीपी वाढला कसा? असा प्रश्न उपस्थित करत खोटे आकडे सांगून पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Previous Post

नवी मुंबई विमानतळाची आकाशाला गवसणी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com