• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2026

हक्कांसाठी आवाज उठवा, पण संविधानाच्या चौकटीत!

adminbyadmin
in देश - विदेश
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

१७ सप्टेंबरच्या जंतरमंतर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हाजी शाहनवाझ खान यांचे शांततापूर्ण आवाहन

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी दिल्ली : १७ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या वतीने नागरिकांना शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र–गोवा कोअर कमिटी तसेच नॅशनल महाराष्ट्र, कोकण विभाग आणि गोवा यांच्या वतीनेही या आवाहनाला पाठिंबा देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हाजी शाहनवाझ खान यांनी नागरिकांनी कायदा आणि संविधानाचा आदर राखत शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कांची व उद्दिष्टांची मांडणी करण्याचे आवाहन केले आहे. आपले प्रश्न आणि मागण्या मांडताना शांतता, न्याय आणि संविधानिक मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या हक्कांसाठी आवाज उठवताना कोणत्याही प्रकारची अशांतता किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार असून, हा अधिकार कायदेशीर आणि शांततापूर्ण पद्धतीने बजावणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

१७ सप्टेंबर रोजी जंतरमंतर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांनीही जागरूक राहावे, तसेच कार्यक्रमात सहभागी होताना कायदा व संविधानाच्या चौकटीचे पालन करावे, असे आवाहन हाजी शाहनवाझ खान यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

“आवाज पुर-शांत असावा, उद्देश स्पष्ट असावा आणि मार्ग संविधानिक असावा,” या भूमिकेवर भर देत कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Previous Post

परिवहन विभागातील सफाई कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करा; अन्यथा आंदोलन

Next Post

कोकणच्या गणेशभक्तांसाठी नितेश राणेंची पोटतिडकी; पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना

Next Post
कोकणच्या गणेशभक्तांसाठी नितेश राणेंची पोटतिडकी; पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना

कोकणच्या गणेशभक्तांसाठी नितेश राणेंची पोटतिडकी; पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com