• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, October 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 28, 2026

दिव्यांगांना स्टॉलसाठी जागा द्या; युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

सारसोळेतील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या मुद्द्यावरून प्रशासनाला सवाल; निखिल मांडवे यांचे आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिव्यांग बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना व्यवसायाकरिता स्टॉल उभारण्यास सिडकोचे भूखंड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन देऊन दिव्यांगांच्या रोजगाराचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबईतील अनेक दिव्यांग व्यक्तींना उपजीविकेसाठी व्यवसाय करण्याची इच्छा असली, तरी स्टॉल सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे मांडवे यांनी निवेदनात नमूद केले आहे. दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात निखिल मांडवे यांनी सारसोळे गावातील प्लॉट क्रमांक २८१ चा उल्लेख केला आहे. सिडकोकडून भूखंड हस्तांतरित होण्यापूर्वीच या जागेवर महापालिकेने अतिक्रमण करून शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारल्याचा दावा त्यांनी केला आहे. आरोग्यविषयक सुविधांसाठी भूखंडाचा वापर केला जात असेल, तर दिव्यांगांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्रशासनाने तत्परता दाखवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दिव्यांगांना केवळ आश्वासन नको, तर स्वावलंबी होण्यासाठी हक्काची जागा मिळावी, अशी मागणी करत सिडकोच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडांवर स्टॉल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन मांडवे यांनी केले आहे. दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Previous Post

नवी मुंबई जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को, क्राईस्ट अकॅडमी, फा. ॲग्नलचे वर्चस्व

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com