• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 30, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 30, 2026

नवी मुंबई मॅरेथॉनमधून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्या!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

‘एक धाव दुष्काळग्रस्तांसाठी’ उपक्रम राबविण्याची युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांची मागणी

स्पर्धकांचे नोंदणी शुल्क आणि प्रायोजकत्वातून मिळणारा संपूर्ण निधी शासनाच्या मदत निधीत जमा करण्याचे आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई : एका बाजूला आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी नवी मुंबई मॅरेथॉन, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक! या दोन्हींची सांगड घालत यंदाच्या नवी मुंबई मॅरेथॉनमधून दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात देण्याची संकल्पना युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांनी मांडली आहे. २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉनमधून स्पर्धकांचे नोंदणी शुल्क आणि कंपन्यांकडून मिळणारे प्रायोजकत्व असा जमा होणारा संपूर्ण निधी राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त मदत निधीत जमा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात मांडवे यांनी १२ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन सादर केले आहे. मॅरेथॉनची जाहिरातच ‘एक धाव दुष्काळग्रस्तांसाठी’ या सामाजिक संदेशासह करावी, जेणेकरून अधिकाधिक स्पर्धक या उपक्रमात सहभागी होतील आणि क्रीडा स्पर्धेला सामाजिक बांधिलकीची जोड मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीच्या वतीने २७ डिसेंबर २०२६ रोजी पाम बीच मार्गावर भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांकडून नोंदणी शुल्क आकारले जाणार असून विविध कंपन्यांकडून प्रायोजकत्वही मिळण्याची शक्यता आहे.

या माध्यमातून महापालिकेला मिळणारा निधी केवळ स्पर्धेच्या आयोजनापुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करावा, असे मांडवे यांचे म्हणणे आहे. मॅरेथॉनसारख्या मोठ्या सार्वजनिक उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याची संधी महापालिकेला मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धकांचे शुल्क आणि प्रायोजकत्वातून मिळणारी संपूर्ण रक्कम राज्य सरकारकडे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोग्यासाठी धावणाऱ्या नवी मुंबईकरांनी यंदा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीही धावावे आणि मॅरेथॉनला सामाजिक बांधिलकीचे व्यापक स्वरूप द्यावे, असा संदेश मांडवे यांनी या निवेदनातून दिला आहे. आता महापालिका प्रशासन या अभिनव संकल्पनेला कसा प्रतिसाद देते, याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ प्रत्येक मच्छीमारापर्यंत पोहोचवा! मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

Next Post

हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ

Next Post
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ

हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com