• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 31, 2026

दुष्काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; महापालिकेला मात्र ‘हिरकणी महोत्सवा’चा घाट !

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

महोत्सवाच्या लाखोंच्या खर्चाऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करा;

विद्या भांडेकर यांची आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे मागणी

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिक संकटात सापडले असताना नवी मुंबई महानगरपालिकेकडून नेरूळ येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिरकणी महोत्सव – गंगा आरती’ कार्यक्रमाच्या खर्चावरून वाद निर्माण झाला आहे. एका बाजूला दुष्काळग्रस्तांना पाणी, चारा आणि आर्थिक मदतीची गरज असताना दुसऱ्या बाजूला महोत्सवासाठी लाखो रुपये खर्च करण्याच्या नियोजनावर नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

भांडेकर यांनी यासंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना ई-मेलद्वारे लेखी निवेदन पाठवून महोत्सवाचा संपूर्ण खर्च जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रस्तावित असलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकरी, पाणीटंचाई निवारण आणि चारा छावण्यांसाठी वळविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना महापालिकेने अशा कार्यक्रमांवर खर्च करण्याला प्राधान्य का द्यावे, असा सवाल भांडेकर यांनी उपस्थित केला आहे. नवी मुंबईतील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारखे मूलभूत प्रश्नही अद्याप पूर्णपणे सुटलेले नसताना करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या या कार्यक्रमाच्या खर्चाचे समर्थन कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी निवेदनातून विचारला आहे.

विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांकडे निवेदन पाठविण्याबरोबरच भांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अधिकृत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठविलेल्या तक्रारीत महोत्सवासाठी होणारा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वळविण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेने सात दिवसांत या निवेदनाला उत्तर देऊन कार्यक्रमाच्या खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा, अन्यथा माहिती अधिकाराचा वापर करून तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विद्या भांडेकर यांनी दिला आहे.

एका बाजूला दुष्काळाने होरपळणारा बळीराजा आणि दुसऱ्या बाजूला महोत्सवासाठी होणारा खर्च, या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन या मागणीची दखल घेणार का आणि महोत्सवाच्या खर्चाचा तपशील जनतेसमोर मांडणार का, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ

Next Post

ग्रामीण महिलांच्या हातांना मिळाले उद्योजकतेचे बळ!

Next Post
ग्रामीण महिलांच्या हातांना मिळाले उद्योजकतेचे बळ!

ग्रामीण महिलांच्या हातांना मिळाले उद्योजकतेचे बळ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com