• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, October 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 31, 2026

अंधारलेल्या डोळ्यांना मिळणार प्रकाशाची नवी दिशा !

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
अंधारलेल्या डोळ्यांना मिळणार प्रकाशाची नवी दिशा !

सावरगावमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर; १३० जणांची तपासणी, १७ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड, १०० जणांना मोफत चष्मेवाटप

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेणे शक्य होत नाही. अशा नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करण्याच्या सामाजिक बांधिलकीतून डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १३० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १७ गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तर १०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

जुन्नर तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून डिसेंट फाउंडेशन आणि शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना पनवेल येथील रुग्णालयात नेण्या-आणण्याची व्यवस्था, निवास, नाश्ता, भोजन, चष्मे आणि आवश्यक औषधे अशा सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही दर्जेदार नेत्रोपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आठ हजारांहून अधिक रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश!

या उपक्रमाची माहिती देताना डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील सावरगाव, जुन्नर, मढ, ओतूर, आळेफाटा आणि नारायणगाव यांसह विविध ठिकाणी आतापर्यंत २५० हून अधिक शिबिरे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत. या माध्यमातून आठ हजारांहून अधिक नेत्ररुग्णांना नवदृष्टी मिळाली आहे. ‘एकही गरजू अंधारात राहू नये’ हा आमचा संकल्प असून, या सेवाकार्याचा लाभ जुन्नर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांतील नागरिकांनाही मिळत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या शिबिराप्रसंगी ह.भ.प. डॉ. गजानन महाराज काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. एफ. बी. आतार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल नाहनाळे, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक विजय बामणे व वैद्यकीय पथक, माऊली आय केअर सेंटरचे विलास बोन्द्रे, वेदांत पडघम, आरोग्य सेवक दिलीप कचेरे, समन्वयक योगेश वाघचौरे, श्रावण घोगरे, आशा सेविका, परिचारिका आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचाराची संधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. केवळ नेत्रतपासणी नव्हे, तर गरिबांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश फुलविणारे हे सेवाकार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

ग्रामीण महिलांच्या हातांना मिळाले उद्योजकतेचे बळ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com