• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2026

प्रभागातील अनधिकृत टपऱ्या,बंद अवस्थेतील वाहने, बेकायदेशीर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करा

adminbyadmin
in ठाणे
0
प्रभागातील अनधिकृत टपऱ्या,बंद अवस्थेतील वाहने, बेकायदेशीर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करा

नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी केली प्रशासनाकडे मागणी

ठाणे – ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मध्ये असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या,बेकायदेशीर वाहनतळ, बंद अवस्थेतील बेवारस वाहने आणि अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई करून, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या विभागात होणारी वाहनांची कोंडी दूर करावी अशी मागणी स्थानिक नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी एका निवेदनाद्वारे पालिका प्रशासन  आणि वाहतूक पोलिस विभागाकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका उषा विशाल वाघ म्हणाल्या, प्रभाग क्रमांक २२ मधील खारटन रोड परिसर, चेंदणी कोळीवाडा, बाजारपेठ परिसर नेहमीच वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरला आहे. या परिसरातून टीएमटी,नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा आणि भिवंडी – कशेळी, काल्हेर कडे रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक दिवसभर होत असते. या वाहतुकीमुळे विशेषतः संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांना वाहनांच्या हॉर्नच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदुषण, त्यातून येणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागतोय. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अस्थमा आणि  श्वसनाच्या इतर रोगांची लागण होण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय भिवंडी, कशेळी, काल्हेर मार्गावर धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालक आपल्या मर्जी प्रमाणे उभे राहतात. कोळीवाडा परिसरात तर जेमतेम दोन रिक्षा उभ्या राहतील  अशी परिस्थिती असताना त्याठिकाणी तिसरी रांग तयार करून वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण करत असल्याचे पाहायला मिळते. या वाचालकांना वाहतूक पोलिसांचेही भय वाटत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जमणारी गर्दी लक्षात घेऊन पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित कारवाई करण्याची गरज आहे.

यासंदर्भात ठामपा आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मिनल संख्ये, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनाही निवेदनाची प्रत दिली असल्याचे उषा विशाल वाघ म्हणाल्या.

Previous Post

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com