१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत
महसूल विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रश्नांचे होणार निराकरण
नवी मुंबई : कोकण विभागातील महसूल विभागाच्या निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक समस्या आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
ही अदालत दुपारी १२ वाजता कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन शाखेतील कक्ष क्रमांक १०६ मध्ये होणार आहे.
कोकण विभागीय पेन्शन अदालत दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आयोजित केली जाते. मात्र नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या मंगळवारी आणि बुधवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने यावेळची अदालत गुरुवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. पेन्शनविषयक तक्रारी असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्जही यावेळी स्वीकारले जाणार आहेत.
कोकण विभागातील पेन्शनधारकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह या पेन्शन अदालतीला उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागाचे तहसीलदार (सामान्य प्रशासन) नरेश जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.