• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2026

कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

हिमांशू रॉय फाउंडेशनच्या ‘एचआरसी’ मोफत कर्करोग तपासणी उपक्रमाचा शुभारंभ

दत्ता वऱ्हाडी : Navimumbailive.com@gmail.com

नाशिक : कर्करोगासारख्या गंभीर आजाराविरोधातील लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी वेळेवर निदान, जनजागृती आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी आरोग्यसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कर्करोग तपासणीच्या आधुनिक सुविधा केवळ शहरांपुरत्या मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, तळागाळातील वंचित आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.

हिमांशू रॉय फाउंडेशन, नामको हॉस्पिटल आणि टीझार लॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘Let’s Checkmate Cancer Together!’ या कर्करोग जनजागृती व मोफत तपासणी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ, हिमांशू रॉय फाउंडेशनच्या संस्थापक भावना रॉय, मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा अझीझ, नामको हॉस्पिटलचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख तसेच टीझर लॅब्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत ‘एचआरसी’ अर्थात ‘हिमांशू रॉय कॅन्सर टेस्ट’ ही रक्ततपासणी महाराष्ट्रातील वंचित व गरजू समुदायांमधील २० हजार नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कर्करोगाशी संबंधित संभाव्य जोखमीचे संकेत वेळीच ओळखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तपासणीच्या निष्कर्षांनुसार आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि पुढील वैद्यकीय तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. शेफाली भुजबळ म्हणाल्या की, कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णासोबत संपूर्ण कुटुंबाला मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे नागरिक आवश्यक तपासण्या पुढे ढकलतात. परिणामी आजाराचे निदान उशिरा होण्याची शक्यता वाढते. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, नियमित तपासण्या आणि व्यापक जनजागृती आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या नागरिकांपर्यंत अशा सुविधा पोहोचल्या पाहिजेत.

हिमांशू रॉय फाउंडेशनने दिवंगत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरोग्यसेवेचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या स्मृतींना समाजोपयोगी कार्याची जोड देत गरजू रुग्णांना तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्यसेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून आजार होण्यापूर्वीच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, वेळेवर तपासणीसाठी प्रोत्साहित करणे आणि आजाराशी लढणाऱ्या रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही व्यक्तीला आरोग्य तपासणी किंवा आवश्यक उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली, तरच निरोगी आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती होऊ शकते, असेही डॉ.शेफाली भुजबळ यांनी नमूद केले.

Previous Post

‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

Next Post

१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत

Next Post
१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत

१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com