• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 3, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2026

‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘हिरकणी महोत्सवा’ला नवी मुंबईकरांची पसंती; महिला बचत गटांच्या वस्तूंची जोरदार खरेदी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

महापौर सुजाता पाटील यांनी साधला महिला उद्योजिकांशी संवाद

नवी मुंबई : महिला बचत गटांनी स्वकर्तृत्वातून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘हिरकणी महोत्सव २०२६’ला दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात विविध आकर्षक वस्तू, हस्तकला साहित्य आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली.

महापौर सुजाता पाटील यांनी महोत्सवाला भेट देऊन महिला स्टॉलधारकांशी संवाद साधला. त्यांनी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेत त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, उपसभापती रूपाली भगत, नगरसेविका स्वप्ना गावडे, प्रिती भोपी आणि समाजविकास विभागाचे उपायुक्त प्रकाश कांबळे उपस्थित होते.

महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात ‘रेड चिली’ ग्रुपच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी महोत्सवाची वेळ सायंकाळी ४ ते रात्री १० अशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह आलेल्या नागरिकांनी खरेदीबरोबरच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महोत्सवस्थळी ठेवण्यात आलेल्या दानपेटीत नागरिकांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकीही जपली.

महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजीही सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरू राहणार असून, नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सभापती सलुजा सुतार, उपसभापती रूपाली भगत आणि समिती सदस्यांनी केले आहे.

Previous Post

‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण

Next Post

कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

Next Post
कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

कर्करोग प्रतिबंध व वेळेवर निदानासाठी तळागाळातील लोकांपर्यंत मोफत तपासणीच्या सुविधा पोहोचवा – डॉ. शेफाली भुजबळ

१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत

१२ नोव्हेंबरला कोकण विभागीय पेन्शन अदालत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com