• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, November 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2026

शेतकऱ्यांकडून ३०-४० रुपये किलोने झेंडूची विक्री; दादरमध्ये मात्र १०० ते १३० रुपये! शेतकरी आणि ग्राहकांची दुहेरी लूट कोणाच्या घशात?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शेतकऱ्यांकडून ३०-४० रुपये किलोने झेंडूची विक्री; दादरमध्ये मात्र १०० ते १३० रुपये! शेतकरी आणि ग्राहकांची दुहेरी लूट कोणाच्या घशात?

शेतात कवडीमोल भाव, बाजारात चढे दर

दिवाळीच्या सणात झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल, तर सर्वसामान्य ग्राहकांचेही खिसे रिकामे

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजन आणि घरांच्या सजावटीसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली. मात्र, ऐन दिवाळीतच बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांसाठी अवघे ३० ते ४० रुपये प्रतिकिलो मिळत असताना मुंबईतील दादर बाजारात हाच झेंडू १०० ते १३० रुपये किलोने विकला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि ग्राहकांनाही स्वस्तात फुले मिळत नाहीत. मग उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दरातील मोठी तफावत नेमकी कोणाच्या फायद्याची ठरतेय, असा सवाल उपस्थित होत आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा, राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, गुंजाळवाडी, आळे, वडगाव आनंद आणि पिंपरी पेंढार आदी गावांमध्ये झेंडूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सध्या या भागात फुलतोडणी सुरू असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ३० ते ४० रुपये किलोचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.

झेंडूच्या लागवडीपासून फुलतोडणीपर्यंत एकरी सुमारे ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. रोपे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यात वाढलेले मजुरीचे दर, ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा धोका आणि औषध फवारणीचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नयेत म्हणून लाकडी आधार उभारण्याचाही अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. एवढे कष्ट आणि खर्च करूनही हातात पुरेसे पैसे पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतात ३० रुपये, दादरमध्ये १३० रुपये!

एकीकडे जुन्नरच्या शेतकऱ्यांना झेंडू ३० ते ४० रुपये किलोने विकावा लागत आहे, तर दुसरीकडे दादरच्या बाजारात ग्राहकांना त्यासाठी १०० ते १३० रुपये मोजावे लागत आहेत. पाडवा आणि लक्ष्मीपूजनाच्या काळात मागणी वाढल्याने किरकोळ बाजारातील दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात कमी पैसे आणि ग्राहकांच्या खिशाला मात्र अधिक कात्री, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

मधल्या साखळीत नेमके काय घडतेय?

शेतकरी उत्पादन खर्चही वसूल करू शकत नाहीत आणि ग्राहकांना फुले महाग दराने खरेदी करावी लागत आहेत. मग शेतातून बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासात दरातील ही मोठी तफावत कशामुळे निर्माण होते? वाहतूक, पॅकिंग, हमाली, बाजारातील कमिशन आणि मध्यस्थांचे व्यवहार यांचा दरावर किती परिणाम होतो? या साखळीतील प्रत्येक टप्प्याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही आर्थिक फटका बसत असताना या व्यवहारातून नेमका कोणाला फायदा होत आहे, याचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांची व्यथा

उब्रंज गावचे प्रगतीशील शेतकरी सुभाषशेठ हांडेपाटील म्हणाले, “सध्या झेंडूच्या फुलांना अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. लागवड, औषधे, खते आणि मजुरी यावर मोठा खर्च झाला आहे. मात्र, मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.”

दिवाळी हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा हंगाम असतो. मात्र, यंदा झेंडू उत्पादकांच्या वाट्याला अपेक्षित आनंदाऐवजी आर्थिक निराशा आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही रास्त दरात फुले उपलब्ध व्हावीत, यासाठी बाजारभावातील तफावतीची चौकशी करून आवश्यक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. शेतकरी राबतोय, ग्राहक भरडला जातोय; मग फुलांच्या या व्यवहारातील नफा नेमका कोणाच्या पदरात पडतोय? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Previous Post

चला, तयारीला लागा! दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत परीक्षांचा श्रीगणेशा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com