• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, November 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2026

डिसेंट फाउंडेशनकडून ५०० महिलांना ‘दशमी’ची भेट!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
डिसेंट फाउंडेशनकडून ५०० महिलांना ‘दशमी’ची भेट!

मनोरंजनातून महिला सक्षमीकरणाचा जागर

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्याविरोधातील संघर्षाचे वास्तव मांडणाऱ्या ‘दशमी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मसन्मान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा जागविण्याचा स्तुत्य उपक्रम डिसेंट फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जुन्नर तालुक्यातील सुमारे ५०० महिलांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. मंगळवार व बुधवार, दि. ३ व ४ नोव्हेंबर रोजी जुन्नर येथील शेवंता चित्रपटगृहात या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांमध्ये आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करणे, अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे धैर्य देणे आणि सामाजिक जागृती घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. यामध्ये जुन्नर तालुक्यातील आशा सेविका, परिचारिका तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमासाठी शेवंता चित्रपटगृहाचे मालक सचिनभाऊ चंद्रकांत कदम यांनी मोफत चित्रपट प्रदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच नगरसेवक अनिल रोकडे, डॉ. सागर शिंदे आणि शिरीष डुंबरे यांनी उपस्थित महिलांसाठी नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी फाउंडेशनच्या आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणारे दंततज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. अस्मिता गायकवाड, अभिनव स्वस्त औषधीचे मालक धीरज खरपूडे, सोनाली खरपूडे तसेच माऊली आय केअर सेंटरचे विलास बोंद्रे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, डॉ. दयानंद गायकवाड, विकास ताम्हाणे, गणेश मेहेर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ‘दशमी’ चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची प्रेरणा मिळावी, स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि समाजात त्यांना सन्मानाचे स्थान मिळावे, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू होता. महिलांचे सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने डिसेंट फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.

Previous Post

शेतकऱ्यांकडून ३०-४० रुपये किलोने झेंडूची विक्री; दादरमध्ये मात्र १०० ते १३० रुपये! शेतकरी आणि ग्राहकांची दुहेरी लूट कोणाच्या घशात?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com