• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 9, 2026

पालकमंत्री आकाश फुंडकरांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; महिलांना साडी-फराळ देऊन सन्मान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पालकमंत्री आकाश फुंडकरांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; महिलांना साडी-फराळ देऊन सन्मान

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिला धीर; शासन खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

अकोला: राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा गावाला भेट देत शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी त्यांना दिलासा दिला. तसेच दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्ताने गावातील शेतकरी व शेतमजूर महिलांचा साडी आणि दिवाळी फराळ देऊन सन्मान केला.

यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, हिवरखेडच्या नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे, तेल्हारा नगराध्यक्ष वैशालीताई पालीवाल, संतोष शिवरकर, सरपंच भारती थोरात, ज्येष्ठ नागरिक विनायकराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री फुंडकर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने तत्काळ अग्रीम मदत जाहीर केली आहे. या मदतीचे वितरणही वेगाने सुरू असून, दुष्काळबाधित शेतकऱ्यांना पुढील काळातही टप्प्याटप्प्याने आवश्यक ती मदत दिली जाईल. राज्य शासन शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून दुष्काळमुक्तीचे स्वप्न

दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्पातील पाणी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. परिणामी विदर्भातील कोरडवाहू भागाला मोठा दिलासा मिळून दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सर्वांसाठी घरे, विविध आवास योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबासोबत केला दिवाळी फराळ

या भेटीदरम्यान पालकमंत्री फुंडकर यांनी शेतकरी गजानन परनाटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ केला. त्यानंतर गावातील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात शेतकरी व महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित महिलांना साडी व फराळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

दिवाळीच्या सणाला पालकमंत्र्यांनी स्वतः गावात येऊन आमच्यासोबत आनंद साजरा केला, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास या भेटीमुळे अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.

Previous Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कष्टांची दिवाळीत जपली जाणार माणुसकी; सोमनाथ वास्कर यांच्या पुढाकाराने सानपाड्यात भेटवस्तू वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com