• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2026

स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांना एक महिन्याचा पगार द्या!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भविष्यात ३ हजार वाहनांची पार्किंग उपलब्ध होणार, मग भूमिगत वाहनतळासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

देशात प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याची निखिल मांडवे यांची मागणी

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये नवी मुंबईने देशात प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर शहराचा गौरव वाढविला आहे. मात्र, या यशासाठी ऊन-पाऊस आणि घाणीची तमा न बाळगता प्रत्यक्ष मैदानात अहोरात्र राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या श्रमांचेही योग्य चीज व्हावे, यासाठी त्यांना एक महिन्याचे वेतन विशेष प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना मागणीपत्र सादर केले आहे.

नवी मुंबईला देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा बहुमान मिळवून देण्यात स्वच्छता कर्मचारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मोठे योगदान आहे. भल्या पहाटे चार वाजल्यापासून रस्त्यांची साफसफाई, नाले-गटारांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलन आणि कचऱ्याचे वर्गीकरण अशी विविध कामे हे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने करीत असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच शहराला देशात अव्वल स्थान मिळविणे शक्य झाले आहे, असे मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

या राष्ट्रीय पुरस्कारानंतर अनेकांकडून यशाचे श्रेय घेतले जात असले, तरी प्रत्यक्ष घाम गाळणारे सफाई कर्मचारी मात्र प्रसिद्धीपासून दूर राहतात. त्यामुळे केवळ कौतुक आणि अभिनंदनापुरता त्यांचा सन्मान मर्यादित न ठेवता त्यांच्या कष्टांची दखल आर्थिक स्वरूपातही घेतली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

या मागणीत कायमस्वरूपी व कंत्राटी सफाई कर्मचारी, कचरा संकलन व वाहतूक करणारे कर्मचारी, स्वच्छता मुकादम, क्षेत्रीय पर्यवेक्षक, प्रत्यक्ष कार्यरत स्वच्छता निरीक्षक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांना एक महिन्याचे वेतन विशेष सन्मान व प्रोत्साहन भत्ता म्हणून तातडीने मंजूर करावे, अशी मागणी निखिल मांडवे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

Previous Post

कॉग्रेसकडून प्रभाग २२ मध्ये गडकिल्ल्यांची पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com