• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2026

स्वच्छतेचा देशात नवी मुंबईचा डंका!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्वच्छतेचा देशात नवी मुंबईचा डंका!

४ हजार ७५१ शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक

‘सेव्हन स्टार’ आणि ‘वॉटर प्लस’ मानांकनही कायम

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवत नवी मुंबई महापालिकेने देशातील ४ हजार ७५१ शहरांमधून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये नवी मुंबई देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर ठरले आहे. यापूर्वी ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये स्थान मिळविणाऱ्या नवी मुंबईने यंदा प्रथम क्रमांकाची झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, कचरामुक्त शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार आणि हागणदारीमुक्त शहराचे वॉटर प्लस मानांकनही कायम राखले आहे.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापौर सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. या ऐतिहासिक यशानिमित्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांनी पत्रकारांशी संवाद साधत या कामगिरीत प्रसारमाध्यमांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले.

नवी मुंबईतील दैनंदिन निर्माण होणाऱ्या १०० टक्के कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत, तर सुक्या कचऱ्यापासून पुनर्वापरयोग्य साहित्य आणि सिमेंट उद्योगासाठी आरडीएफ तयार केले जाते. जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी टेक्स्टाइल रिकव्हरी फॅसिलिटी, झोपडपट्ट्यांमध्ये शून्य कचरा मॉडेल, बांधकाम कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक आणि प्लास्टिकपासून बाके व डस्टबिन तयार करण्यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीवर ११.४ एकर क्षेत्रात १.३ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून उभारलेले निसर्ग उद्यान हे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे. तसेच स्वच्छता पार्कच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरण व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

शहरातील सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी सात आधुनिक मलप्रक्रिया केंद्रे कार्यरत आहेत. प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी ३० टक्क्यांहून अधिक पाण्याचा औद्योगिक वापर, उद्याने आणि बांधकामांसाठी पुनर्वापर केला जातो. याशिवाय ‘माय एनएमएमसी’ अॅप, व्हॉट्सॲप चॅटबॉट, एआय आधारित तक्रार प्रणाली आणि एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाते. २९१ मार्गांवरील २४६ कचरा संकलन वाहनांचे जीपीएसद्वारे निरीक्षण केले जाते.

खाडीकिनारे, जेट्टी, तलाव आणि खारफुटी परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये दोन हजारांहून अधिक एनएसएस विद्यार्थी, स्वयंसेवक आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एकल वापर प्लास्टिकविरोधी मोहिमा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, निर्माल्य संकलन, ई-कचरा संकलन आणि दिवाळीतील विशेष स्वच्छता मोहिमांमधूनही नागरिकांचा सहभाग वाढविण्यात आला. दिवाळीदरम्यान २५० हून अधिक स्वच्छतामित्रांनी २५ टनांपेक्षा अधिक कचरा संकलित केला.

स्वच्छतामित्रांचे कष्ट, प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीच्या बळावर नवी मुंबईने राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळविला आहे. हा पुरस्कार केवळ महापालिकेचा नसून शहरातील प्रत्येक नागरिकाचा आहे. स्वच्छतेचा हा लौकिक कायम राखत शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक अधिक उंचावण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे.

Previous Post

स्वच्छतेचा मान राखणे हीच खरी जबाबदारी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com