• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2026

अजितदादांच्या जाण्याने विलीनीकरणाला पूर्णविराम!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अजितदादांच्या जाण्याने विलीनीकरणाला पूर्णविराम!

‘माझ्यासाठी तो विषय तेव्हाच संपला’; सुप्रिया सुळेंची भावनिक भूमिका,

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना नवा विराम

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर स्पष्ट आणि भावनिक भूमिका मांडली आहे. ‘अजित पवार असेपर्यंत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या अकस्मात निधनानंतर माझ्यासाठी हा विषय संपला,’ असे सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटी, दोन्ही गटांतील नेत्यांच्या चर्चा आणि भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांच्या विधानांमुळे विलीनीकरणाच्या शक्यतेला पुन्हा हवा मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनीही ‘वेळ येईल तशा सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असे सूचक विधान केल्याने राजकीय उत्सुकता वाढली होती.

मात्र, गुरुवारी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबत आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले. ‘कसले एकत्रीकरण? माझ्याशी तरी याबाबत कोणीही बोललेले नाही,’ असे सांगत त्यांनी सुरू असलेल्या चर्चांपासून अंतर राखले. शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार गटातील आमदारांनी वेळ मागितल्याबाबत बोलताना, शरद पवार ज्येष्ठ नेते असल्याने त्यांची भेट घेण्यात नवीन काही नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याची कबुली दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या घडामोडींची आठवण करून दिली. १७ जानेवारी रोजी गोविंदबागेत झालेल्या बैठकीसह विलीनीकरणाच्या चर्चांची माहिती सर्वांसमोर होती. अजित पवार यांनी स्वतः आपल्याशी आणि पक्षातील नेत्यांशी याबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर आपण या विषयावर पडदा टाकला, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय समीकरणांच्या पलीकडे भावंडांचे नाते आणि एका अपूर्ण राहिलेल्या राजकीय चर्चेची सल सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातून जाणवली. अजितदादा असताना चर्चेत असलेले विलीनीकरण आता त्यांच्या पश्चात कोणत्या दिशेने जाणार, हा प्रश्न कायम असला तरी सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्या भूमिकेतून या विषयाला भावनिक पूर्णविराम दिला आहे.

Previous Post

स्वच्छतेचा देशात नवी मुंबईचा डंका!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com