• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2026

सरकारी कार्यालयात घाणीचे साम्राज्य; मंत्र्यांच्याच हाती झाडू!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सरकारी कार्यालयात घाणीचे साम्राज्य; मंत्र्यांच्याच हाती झाडू!

जामनेर तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून गिरीश महाजन संतप्त

अधिकारी-कर्मचाऱ्यांची खरडपट्टी

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जळगाव : सरकारी कार्यालये ही नागरिकांना सेवा देणारी केंद्रे असतात; मात्र याच कार्यालयांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असेल, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात आला. कार्यालयातील धूळ, जाळी, कोळीष्टके आणि दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे पाहून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा संताप अनावर झाला. केवळ अधिकाऱ्यांना सूचना देण्याऐवजी त्यांनी स्वतः हातात झाडू घेत साफसफाई सुरू केली. मंत्र्यांनाच झाडू हाती घ्यावा लागल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या स्वच्छतेच्या दाव्यांचे वास्तव समोर आले आहे.

जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेसाठी महाजन जामनेर तहसील कार्यालयात पोहोचले होते. मात्र, कार्यालयात प्रवेश करतानाच त्यांच्या डोक्याला कोळीष्टक लागले. संपूर्ण कार्यालयात धूळ आणि जाळ्यांचे साम्राज्य होते. स्वच्छतागृहांची अवस्था तर अधिकच गंभीर होती. तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्याही आढळून आल्या. स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांसाठी ५०० रुपये दंडाचे फलक लावलेले असतानाही कार्यालयात ठिकठिकाणी थुंकल्याचे आणि अस्वच्छता असल्याचे चित्र दिसले.

या प्रकाराने संतप्त झालेल्या महाजन यांनी आधी बैठक घेण्याऐवजी स्वच्छतेला प्राधान्य दिले. स्वतः झाडू हातात घेत साफसफाई सुरू करत त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाब विचारला. एवढी चांगली इमारत उभारूनही तिची देखभाल आणि स्वच्छता राखली जात नसेल, तर ही गंभीर बाब आहे. हे दृश्य पाहून आपल्यालाच लाज वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, २ ऑक्टोबरला स्वच्छता मोहीम राबविल्यानंतरही अवघ्या काही दिवसांत कार्यालयाची अशी अवस्था झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ दंडाचे फलक लावून किंवा स्वच्छता मोहिमांचे आयोजन करून उपयोग नाही, तर नियमित स्वच्छता आणि कार्यालयीन शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मंत्र्यांनी हातात झाडू घेऊन दिलेला हा कृतीतून संदेश केवळ जामनेर तहसील कार्यालयापुरता मर्यादित नाही. नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या प्रशासनाने आधी स्वतःच्या कार्यालयांची अवस्था सुधारावी, हाच या घटनेचा खरा बोध आहे. सरकारी कार्यालयांची स्वच्छता ही विशेष मोहिमेची नव्हे, तर रोजच्या प्रशासकीय कामकाजाचा अविभाज्य भाग असायला हवी, अशी प्रतिक्रिया जळगाववासियांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पुण्याची स्वच्छतेत घसरण; दाव्यांची पोलखोल !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com