• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2026

मृत्यूच्या दारातून मायाला नवी आशा; वनतारात उपचारांची लढाई सुरू!

adminbyadmin
in देश - विदेश
0
मृत्यूच्या दारातून मायाला नवी आशा; वनतारात उपचारांची लढाई सुरू!

इच्छामरणाची शिफारस झालेल्या १८ महिन्यांच्या हत्तीणीवर अतिदक्षतेत उपचार

सहा दिवसांनंतरही प्रकृती गंभीर, बरे होण्यासाठी तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जामनगर : जन्मानंतर अवघ्या काही तासांत आई आणि कळपापासून दुरावलेली, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मायेवर वाढलेली आणि आता गंभीर आजारामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेली १८ महिन्यांची हत्तीण ‘माया’ सध्या आयुष्याची कठीण लढाई लढत आहे. तिच्या जगण्याची आशा जवळजवळ मावळली असताना अनंत अंबानी यांच्या जामनगर येथील ‘वनतारा’ने उपचारांची जबाबदारी स्वीकारली. ६ नोव्हेंबर रोजी विशेष वैद्यकीय विमानाने केरळमधून जामनगरला आणल्यानंतर तिच्यावर अतिदक्षतेत उपचार सुरू आहेत. या घटनेला सहा दिवस उलटले असले, तरी मायाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून सावध भूमिका घेतली जात आहे.

मायाची कहाणी सुरू झाली ती १९ एप्रिल २०२५ रोजी. केरळमधील मलयाट्टूर वन विभागाच्या कपरीक्कड परिसरात ती जन्मानंतर कळपापासून विलग झालेल्या अवस्थेत आढळली. अशक्त आणि निर्जलीकरणामुळे तिची अवस्था गंभीर होती. आईचे दूधही न मिळालेल्या या पिल्लाला केरळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले. डॉ. बिनॉय सी. बाबू आणि काळजीवाहक निखिल बाबू यांनी तिला नियमित दूध, औषधोपचार आणि मायेचा आधार दिला. त्यांच्या सहवासातच मायाचे बालपण आकार घेत होते.

मात्र, जुलै २०२६ मध्ये खेळताना पाय घसरून पडल्याने तिच्या खांद्याला दुखापत झाली आणि तिच्या आयुष्याची लढाई अधिक कठीण बनली. उपचार, फिजिओथेरपी आणि पोषणपूरक औषधे देऊनही हाडांची स्थिती सुधारली नाही. उलट, हाडे अधिक ठिसूळ होत गेली. ऑक्टोबरच्या अखेरीस तिच्या दोन्ही पुढच्या पायांना फ्रॅक्चर झाले. छातीचा संसर्ग आणि दीर्घकाळ पडून राहिल्याने निर्माण झालेल्या जखमांमुळे तिची प्रकृती आणखी खालावली. स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची क्षमताही तिने गमावली.

इच्छामरणाच्या शिफारशीतून उपचारांची नवी आशा

मायाची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने केरळमधील वैद्यकीय समितीने तिचे हाल टाळण्यासाठी इच्छामरणाची शिफारस केली होती. मात्र, अंतिम निर्णयापूर्वी अधिक तज्ज्ञांचे मत घेण्याचा निर्णय झाला. पद्मश्री डॉ. कुशल कोंवर सरमा यांनी मायाचे वैद्यकीय अहवाल, एक्स-रे आणि तपासण्या पाहिल्यानंतर तिच्या हाडांच्या विकारामागे पॅराथायरॉईड ग्रंथीशी संबंधित समस्या असण्याची शक्यता व्यक्त केली. योग्य निदान आणि विशेष उपचारांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते, अशी आशा निर्माण झाली. त्यानंतर वनताराच्या तज्ज्ञांच्या मदतीने तिला जामनगरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वनतारात २४ तास वैद्यकीय देखरेख

६ नोव्हेंबर रोजी विशेष चार्टर्ड वैद्यकीय विमानातून मायाला जामनगर येथील वनताराच्या विशेष पशुवैद्यकीय उपचार केंद्रात आणण्यात आले. प्रवासादरम्यानही तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून होते. वनताराचे पशुवैद्यक, पॅराव्हेट्स आणि काळजीवाहक तिच्यासोबत होते. सध्या तिच्यावर चोवीस तास वैद्यकीय देखरेख, वेदनाशमन उपचार आणि सुरक्षितरीत्या हालचाल व स्थिती बदलण्यासाठी विशेष हायड्रॉलिक यंत्रणेच्या मदतीने उपचार सुरू आहेत.

वनताराकडून ८ नोव्हेंबरला देण्यात आलेल्या माहितीनुसार, मायाला सुरक्षितपणे जामनगर येथे आणण्यात आले असून तिची अत्यंत नाजूक प्रकृती स्थिर करण्याला प्राधान्य दिले जात आहे. १० नोव्हेंबरच्या वृत्तानुसारही ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. प्रकृती स्थिर झाल्यानंतर हाडे कमकुवत होण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी प्रगत निदान चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार हार्मोनल उपचार आणि हायड्रोथेरपीचा विचार केला जाणार आहे. उपचारांना किती वेळ लागेल, याबाबत अद्याप निश्चितता नाही; प्राथमिक उपचारांचा कालावधी चार ते सहा महिने असू शकतो.

मायेचा आधारही जामनगरमध्ये सोबत

नव्या ठिकाणी, अनोळखी वातावरणात मायाला मानसिक ताण येऊ नये, यासाठी तिच्या परिचयाचे काळजीवाहक निखिल बाबू आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिनॉय सी. बाबू तिच्यासोबत जामनगरमध्ये आहेत. ज्यांच्या हातून तिने पहिल्यांदा दूध घेतले, ज्यांच्या सहवासात ती वाढली, तेच परिचित चेहरे आजही तिच्या जवळ आहेत. वैद्यकीय उपचारांबरोबरच हा परिचित सहवास तिच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

दरम्यान, मायाच्या उपचारांवर देखरेख ठेवण्यासाठी केरळ वनविभागाने विशेष समिती स्थापन केली आहे. तिच्या उपचारांची प्रगती नियमितपणे तपासली जाणार आहे. केरळ वनविभागाची देखरेख कायम राहणार असून उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि प्रकृती सुधारल्यानंतर मायाला पुन्हा केरळमधील अभयारण्यात परत नेण्याचे नियोजन आहे.

आशेचा किरण; पण लढाई अजून बाकी!

मायाच्या आयुष्यातील ही लढाई अजून संपलेली नाही. तिची हाडे कितपत मजबूत होतील, ती पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहू शकेल का आणि नैसर्गिक जीवनाकडे परतू शकेल का, या प्रश्नांची उत्तरे आगामी उपचारांनंतरच मिळणार आहेत. मात्र, इच्छामरणाच्या शिफारशीनंतरही तिच्यासाठी उपचारांचा मार्ग खुला झाला, हीच सध्या आशेची मोठी बाब आहे.

एका मुक्या जीवाला जगण्याची आणखी एक संधी मिळावी म्हणून सुरू असलेले हे प्रयत्न केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नाहीत; ते माणुसकी, संवेदनशीलता आणि जीवमात्रांप्रती असलेल्या करुणेचेही उदाहरण आहेत. मायाच्या छोट्याशा पावलांनी पुन्हा एकदा जमिनीला स्पर्श करावा, ती स्वतःच्या पायांवर उभी राहावी आणि केरळच्या परिचित अधिवासात परतावी, हीच तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा आहे.

Previous Post

पाणीबाणी मराठवाड्याच्या चुलीपर्यंत पोहोचली!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com