• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 16, 2026

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा उदंड प्रतिसाद!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा उदंड प्रतिसाद!

शिवरायांचा इतिहास अन् दुर्गसंवर्धनाचा जागर; अंतिम फेरीसाठी २५ किल्ल्यांची निवड

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : दिवाळीच्या सणात अंगणात किल्ले उभारण्याची परंपरा जपत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा २०२६-२७’ ला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत शालेय आणि खुल्या गटातील तब्बल १४९ समूहांनी सहभाग नोंदवून ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन, गड-किल्ल्यांविषयी जनजागृती आणि लहान मुले व युवकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरल्याचे समाधान महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेत शालेय गटातून २६, तर खुल्या गटातून १२३ समूह सहभागी झाले होते. नोंदणी केलेल्या सर्व १४९ किल्ल्यांच्या ठिकाणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे इतिहासप्रेमी फाइन आर्ट कलावंत शिवम घोडजकर आणि प्रशांत धाडवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्राथमिक परीक्षण केले. किल्ल्यांची रचना, बांधणीतील बारकावे, कलात्मकता आणि रेखीवपणा यांची पाहणी करण्याबरोबरच सहभागी मुलांकडून किल्ल्यांचा इतिहास व वैशिष्ट्यांची माहितीही जाणून घेण्यात आली.

महानगरपालिकेच्या वतीने सर्व किल्ल्यांचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. प्राथमिक परीक्षणातून शालेय गटातील ६ आणि खुल्या गटातील १९ अशा एकूण २५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. अंतिम परीक्षणानंतर प्रत्येक गटातील उत्कृष्ट तीन किल्ल्यांना तसेच प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

विजेत्यांवर पारितोषिकांची बरसात

खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तर शालेय गटात अनुक्रमे २० हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही गटांत प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके म्हणून पाच हजार रुपये दिले जाणार आहेत.

महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दिवाळीतील किल्ले बांधणीची परंपरा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता त्यातून शिवरायांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीच्या मनात रुजावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. १४९ समूहांच्या सहभागातून नवी मुंबईत शिवइतिहास आणि दुर्गसंवर्धनाचा जागर उत्साहात झाल्याचे या स्पर्धेने अधोरेखित केले आहे.

Previous Post

जयवंत सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय सेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com