• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 16, 2026

जयवंत सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय सेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जयवंत सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय सेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

समाजसेवक प्रतिक सुतार यांचा स्तुत्य उपक्रम

५०० हून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

नवी मुंबई : वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेतून साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम नवी मुंबईत राबविण्यात आला. नवी मुंबईचे माजी महापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २१ मधील समाजसेवक प्रतिक सुतार यांच्या पुढाकाराने शिरवणे येथे आयोजित दोन दिवसीय शासकीय सेवा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १५ व १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिराचा ५०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

जयवंत सुतार यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आयोजित या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. उत्पन्नाचे दाखले, एसटी महामंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सवलत मिळविण्यासाठी एनसीएमसी (NCMC) ओळखपत्र, वैद्यकीय सुविधांसाठी आयुष्मान भारत ओळखपत्र आदींसाठी अर्ज प्रक्रिया करण्यात आली.

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच विधवा व एकल महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन अर्जही शिबिरात भरून देण्यात आले. विविध योजनांची माहिती, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आल्याने अनेक लाभार्थ्यांचा शासकीय कार्यालयांतील हेलपाटे आणि प्रक्रियेचा त्रास कमी होण्यास मदत झाली.

शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती देणे आणि कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. समाजसेवक प्रतिक सुतार यांनी घेतलेल्या पुढाकारातून वाढदिवसानिमित्त सामाजिक सेवेचा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.

या शिबिराला समाजसेविका निर्मला सुतार, अरुणा भोईर, अनिता पाटील, वर्षा पवार, समाजसेवक प्रभाकर ठाकूर, नरेश सुतार, दिलीप घरत, विनायक भोईर, विजय सुतार, जयवंत सुतार, माधव सुतार, दिपेश पाटील, प्रशांत घरत, रविंद्र म्हात्रे, एकनाथ मुंबईकर, प्रणाल पाटील, नितीन शेडगे, विशाल सुतार, रोशन किरडवकर, अनिल रासकर, रविंद्र काटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous Post

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा !

Next Post

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा उदंड प्रतिसाद!

Next Post
नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा उदंड प्रतिसाद!

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा उदंड प्रतिसाद!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com